नंदुरबार दि ३१(प्रतिनिधी) येथील जिजामाता शिक्षण संस्थेच्या जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे मूल्यांकन व नामांकनासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद नॅक समितीने नुकतीच भेट दिली. समितीचे चेअरमन उत्तर प्रदेश मुरादाबाद येथील आयएफडीएम विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक महेंद्र प्रसाद पांडे होते. तर समन्वयक मध्य प्रदेश इंदोर येथील देवी अहिल्या विश्व विद्यालयातील शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख होते. समिती सदस्य राजस्थान जोधपूर येथील जैन नारायण व्यास विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे संचालक होते. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेटिव्ह, बेस्ट प्रॅक्टिसेस व प्राचार्यांनी केलेल्या संशोधन कार्याबाबत समाधान व्यक्त केले.
संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबाबतही समाधान व्यक्त केले. ग्रामीण व आदिवासी भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संस्थेने उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर वर्ग व संशोधन केंद्र सुरू करावे अशी शिफारस केली आहे. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत बाबा मोरे, सचिव डॉ. अभिजीत दादा मोरे यांनी आपला अमूल्य वेळ देऊन महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा. संदीप भदाणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.