Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एन.एन.एम.एस. परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी, पालकांच्या हस्ते देवरे विद्यालयात प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण

नंदुरबार  दि ३१ (प्रतिनिधी) तालुक्यातील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाचे,श्री. आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण विद्यालयातील एन.एम.एम.एस. परीक्षेत विद्यालयात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु.सुवर्णासह पालक सौ.प्रतिभा व डिगंबर मुरलीधर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,स्काऊट, गाईड परेड संचलन सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी केले.ध्वजारोहणा- प्रसंगी विखरण येथील सरपंच प्रतिनिधी रोहिदास साळुंके, माजी सरपंच केशव पाटील, माजी उपसरपंच रवींद्र पाटील, सेवानिवृत्त लिपिक आर.एम. पाटील,पालक काशिनाथ पाटील व विखरण, नाशिंदा, खापरखेडा,बोराळा येथील पालकांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.