Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई - नंदुरबार शहर व नवापूर येथे अवैधरित्या गॅस रिफिलींग करणार-या ३७ सिलंडर, ०७ इलेक्ट्रोक मोटर, ०४ वजन काटे असा एकुण 3 लाख २० हजारांचा मुद्दमाल जप्त़.

नंदुरबार दि ३० (प्रतिनिधी)‌शहर व नवापूर येथे अवैधरित्या गॅस रिफिलींग
करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
३७ सिलंडर, ०७ इलेक्ट्रोक मोटर, ०४ वजन काटे असा एकुण 3 लाख २० हजारांचा मुद्दमाल जप्त़. 
        जिल्हयात वेळोवेळो अवैध बाबींवर कारवाईं करण्याचे आदेश यापूर्वीच पोलीस अधीक्षक श्रीःश्रवण
दत्त.एस यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून वेळोवेळी अवैध बाबींवर कडक कारवाई देखील करण्यात येत आहे़. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार शहरातील गाझी नगर पारिसर, भाणे फाटा पारिसर, पटेलवाडी पारिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात काही इसम हे विना परवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस हा मोटरीच्या सहाय्याने वाहनांमध्ये भरुन रिफिलिंगचा व्यवसाय करीत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस 
अधीक्षक श्रीःश्रवण दत्त॰एस यांचे मार्गदर्शनाखाली स्था. गु.शा. पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी 
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पथके तयार करुन कारवाई करणेकामी रवाना केले.
               स्थानिक गुन्हे शाखेचे नंदुरबार शहरातील पथकाने मिळालेली बातमीनुसार शहरातील वर नमुद
वेगवेगळया ठिकाणी जाऊन खात्री केली असता खालील नमुद इसम हे विनापरवाना गॅस रिफिलींग करित
असल्याचे दिसून आले. त्यामध्ये l. गाझी नगर परिसरात अफसरोद्दीन नवाजोद्दीन काझी . वय-२७ वर्ष . रा. गाझी नगर. नंदुरबार 2. भोणे फाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी. वय ५० वर्षे. रा. भाट गल्ली शनी मंदीरा
जवळ. नंदूरबार. ह.मू.गांधी नगर. नंदुरबार 3. पटेलवाडी परिसरात आसिफ दादाभाई पिंजारी. वय- ३१ वर्ष . रा॰
ह.मु॰ बिक़सी. हॉस्टेल समोर, पटेलवाडी नंदुरबार 4. पटेलवाडी पारिसरात फयाज सईद कुरेशी, वय-19 वर्ष रा॰ मंगळ बाजार नंदुरबार दुकान मालक 5. आमीन वाहीद पिंजारी . रा.पटेलवाडी. नंदुरबार यांचेविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे नंदुरबार शहरातील पथकाकडून कारवाई करण्यात आली. तसेच नवापूर येथील सरदार चौक परिसरात 6. जुनेद फारुक काथावाला, रा.सरदार चौक, श्रीकृष्ण मंदीर समोर, नवापूर यांचाविरुध्द स्थानिक गुन्हे शाखचे नवापूर पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे.
        सदर अवैधारित्या गॅस रिफिलींग करणा-या नंदुरबार शहर व नवापूर येथील इसमांवर स्थानिक
गुन्हे शाखेने कारवाई करत त्यामध्ये ३७ सिलॅंडर, 0७ इलेक्ट्रिक मोटर, ०४ वजन काटे असा एकुण 3 लाख
२० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून नमुद इसमांवर भा.न्या संहिता कलम २८७, २८८, 125 सह
जिवनाश्यक वस्तु आधि. कलम 3 व 7 प्रमाणे संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक
श्री .आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलोस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पो.उप.नि
श्री मुकेश पवार, पोहेकॉं,मुकेश तावडे, मनोज नाईक सजन वाघ, राकेश वसावे महेंद्र नगराळे जितेंद्र तोरवणे,
विशाल नागरे दादाभाई मासुळ. राकेश मोरे पोना मोहन ढमढेरे आविनाश चव्हाण. पोकॉ।अभय राजपूत. राजेंद्र
काटके. यशोदोप ओगले. रामेश्र्वर चव्हाण आनंदा मराठे यांनी केली आहे