Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वराज्य सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांना देवरे विद्यालयात मानाचा मुजरा, शोभा यात्रे उत्साह

स्वराज्य सूर्याला देवरे विद्यालयात मानाचा मुजरा 

विखरण दि १९ (प्रतिनिधी) श्री.आप्पासाो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता नंदुरबार येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. 
विखरण गावातून लेझीम,घोषवाक्यांच्या गजरात ट्रॅक्टर ट्रॉलीवर बाल शिवबा, राजमाता जिजाऊ,मावळे, जिजाऊंच्या सख्या अशा दैदिप्यमान इतिहासकालीन देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली. गावातीलचौकाचौकात बाल शिवबाला राजमाता स्वराज्य स्थापनेच्या कार्याचे आदेश देतांना व तितक्याच अदबीने बाल शिवबा आज्ञेनुसार पालन करण्याचे मान्य करण्याचे संवादांतून गावकऱ्यांचे, अबालवृद्धांची मने जिंकून शिवजयंत्योत्सव संस्मरणीय अनुभूती ठरला.शिवबाच्या भूमिकेत ज्ञानराज पाटील, जिजाऊंच्या भूमिकेत देवर्षी पाटील,सख्या तनुषा पाटील तेजस्विनी भोसले व मावळा हरिषकुमार साळुंके यांनी भूमिका बजावल्या.तत्पूर्वी गावातील बसस्थानक परिसरातील शिवप्रतिमेचे प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन गावातील जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, उपशिक्षक सी.व्ही.नांद्रे, डी.बी.भारती, एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल,एस.एच. गायकवाड, एम.एस.मराठे,आर.आर.बागुल,ए.एस.बेडसे, डी‌.बी.पाटील,एच.एम.खैरनार ,एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.