क्रीडा विभाग, शिक्षण विभाग आणि डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने “जय शिवाजी - जय भारत” पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, प्राथमिक शिक्षणधिकारी वंदना वळवी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ, प्राचार्य सीमा मोडक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवरायांच्या जयघोष डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केला. यावेळी जिजाऊ-शिवराय औक्षण कार्यक्रम घेण्यात आला. शिवरायांच्या स्वराज्य शपथ कार्यक्रम सादर करण्यात आला. 
यानंतर पदयात्रेला जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी हिरवी झंडी दाखवून सुरुवात केली. पदयात्रेत कमला नेहरू विद्यालय, डी.आर. हायस्कूल आणि एकलव्य विद्यालयाचे लेझीम पथक, श्रॉफ हायस्कूलचे स्केटिंग पथक, पथराई सैनिकी विद्यालयाचे मल्लखांब पथक, यशवंत विद्यालयाचे ढोल पथक, आरोग्य विभागाचे नर्सेस स्टाफ आणि सर्व डॉक्टर्स सहभागी झाले. 
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनिंनी भारत माता, जिजाऊ, शिवराय, मावळे यांचे पेहराव करून पदयात्रेत सहभाग घेतला. पदयात्रा अंधारे चौकातून नगरपालिका-नेहरू पुतळा-हाट दरवाजा-शास्त्री मार्केट या मार्गाने जाऊन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरी च्या वतीने अध्यक्ष सय्यद इसरार आणि नंदकुमार सूर्यवंशी यांच्या मार्फत सहभागी विद्यार्थ्याना बिस्किट आणि पाणी बोटल यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलच्या संपूर्ण स्टाफ सह शिक्षण विभागाचे डॉ. युनूस पठाण, क्रीडा विभागाचे संजय बेलोरकर, महेंद्र काटे, मुकेश बारी, भगवान पवार, योगेश रघुवंशी, सुनील बोरसे, बळवंत निकुंभ, सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले.