Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एस एम मिशन स्कॉलर ऑफ द इयर 2024 -2025 वेदिका सूर्यवंशी बेस्ट स्कूल गर्ल हिताक्षी हिवरे व बेस्ट बॉय ऑफ द स्कूल आशिष पाटील सन्मानित

*वार्षिक पारिताेषिक व महिला दिवस साजरा*

तळाेदे,येथील एस.ए.एम.इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज शनिवार दिनांक 8 मार्च राेजी शालेय व सहशालेय विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते देऊन गाैरविण्यात आले.बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून  डाँ.संदिप जैन व डाँ.वेणीलाल चाैधरी, अँड.शैलेंद्र कापुरे व सामाजिक कार्यकर्ते माेबिनभाई मण्यार हे मान्यवर उपस्थित हाेते.
यावेळी इयक्ता दहावीचा विद्यार्थी व हेड बाँय माेहित पकंज तांबाेळी व हेड गर्ल वेदिका अरविंद सुर्यवंशी तसेच ब्लू हाँऊस कप्टन पाटिल प्रणव दिनेश,व पाटिल भक्ती देवेंद्र,ग्रीन हाँऊस चे प्रमुख भाेसले जयदिप सना व पिंजारी अल्फीया फिराेज,रेड हाँऊस चे दुबे प्रखर पुष्पेंद्र व पवार भुमिका याेगेश ,तसेच येलाे हाँऊस कप्टन पाटिल आशिष प्रशांत व पाडवी तृप्ती संजय या विद्यार्थ्यांनी वर्षभर आपापल्या हाँऊस चे कार्य वर्षभर यशस्वीरित्या सांभाळल्याबद्दल त्यांच्या गौरव करण्यात आला तसेच बेस्ट स्पोर्ट पर्सन खेडकर अमन अर्जुन व मुलींमध्ये पाडवी छाया नरपतसिंग यांना उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात आला
स्कॉलर ऑफ द इयर 2024 -2025 सूर्यवंशी वेदिका अरविंद बेस्ट स्कूल गर्ल हिताक्षी हेमंत हिवरे व बेस्ट बॉय ऑफ द स्कूल पाटील आशिष प्रशांत या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे अँड.शैलेंद्र कापुरे व डॉक्टर संदीप जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षणा सोबतच मैदानी खेळही तेवढेच महत्त्वाचे असतात असे प्रमुख पाहुण्यांनी प्रतिपादन केले. तसेच शारीरिक आरोग्य राखण्यासाठी व्यायाम ,कसरत, प्राणायाम किती महत्वाचे हे प्रतिपादन केले. तसेच मोबाईलच्या अतिवापर टाळावा असे प्रामुख्याने सांगितले.
        यानंतर महिला दिवस चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपिका पी.आर. वसावे मॅडम व एस.एच.टवाळे मॅडम यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादरीकरण केले इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी रोल मॉडेल यात सावित्रीबाई फुले ,किरण बेदी ,इंदिरा गांधी इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्व व त्यांच्या कार्य सादर केले तेजल पाटील या विद्यार्थ्यानीने आपल्या भाषणावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच इयत्ता सहावी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाट्यद्वारे व नृत्यद्वारे महिला दिनाच्या महत्व स्पष्ट करून दिला. तसेच इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मुलीच्या शिक्षण किती महत्त्वाचे आहे व समाजाला व देशाला पुढे नेण्यासाठी किती आवश्यक आहे हे नाट्यकरणाद्वारे सादर केले. यावेळी शाळेतील महिला शिक्षकांनी छान नृत्य सादर करून उपस्थितांचे दाद मिळवली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या पी.आर.वसावे मॅडमनी महिला दिवसाच्या इतिहास व महिलांना करावा लागणारा संघर्ष याबद्दल माहिती सांगितली तसेच मुख्याध्यापक श्री. सत्यजित नाईक सरांनी महिलाही सुजनशिल व कर्तुत्ववान असते व आपल्या ला मिळालेल्या प्रत्येक संधीच्या उपयोग करून जीवनातील विविध भागात आज आपल्या कर्तुत्वाने मानाने उभी आहे असे प्रतिपादन केले.
       महिला दिन औचित्यवर सर्व माता पालकांना आमंत्रित करून त्यांच्यासाठी विविध स्पर्धा आयाेजित करण्यात आले हाेते. उखाणे ,संगीत खुर्ची इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते उखाणे स्पर्धेत साै.वनश्री बडगुजर प्रथम ,साै.अर्चना नगरकर द्वितीय व साै.स्मिता राणे यांनी तृतीय पारितोषिक मिळवले संगीत खुर्ची या स्पर्धा प्रकारामध्ये माता पालक साै.वंदना साळी प्रथम,साै. संगीता चव्हाण द्वितीय व साै.सीमा जाधव तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले शिक्षक शिक्षिका वर्गातील संगीत खुर्ची या स्पर्धेत श्रीमती मनीषा मगरे प्रथम, विद्या वळवी द्वितीय तर चंदना नाईक मँडमांनी तृतीय पारितोषिक पटकवले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाडवी तर महिला दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा मगरे व मंगला कापुरे या शिक्षीकांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.मिल्का वळवी यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.