Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळ शहादा चा जागतिक महिला दिन संपन्न

सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळात जागतिक महिला दिन संपन्न,
 शहादा दि ८(प्रतिनिधी) सरदार पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळ शहादा ची द्वि मासिक बैठक नुकतीच संपन्न झाली. 
      बैठकीचे अध्यक्षस्थान सतीश केशव सोनवणे यांनी स्वीकारले. या सूचनेस डी जी पाटील सर यांनी अनुमोदन दिले सर्व ज्येष्ठांनी साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही प्रार्थना सामुदाईकरीत्या सुस्वरात म्हटली व्यासपीठावर सतीश सोनवणे, जे.डी पाटील सर, सुभाष अप्पा, शिवदास पाटील,डी एच आप्पा पाटील, माजी नगराध्यक्षा श्रीमती .कांताबाई पाटील,श्रीमती अलकाताई पाटील,श्रीमती सरलाताई मराठे हे आमंत्रीत पाहुणे होते.
        व्यासपीठावरील मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.कार्यक्रम सूची प्रमाणे समाजातील दिवंगत महापुरुष, जवान, राष्ट्रपुरुष व सभासदांचे दिवंगत नातलग यांना आदराने विनम्र दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.मागील सभेचे इतिवृत्त संस्थेचे सचिव आनंदराव विसपुते यांनी वाचन करून दाखवले व जमाखर्चाच्या तपशील दिला, त्या सभासदांनी मंजुरी दिली. मंडळातील सभासद बंधू यांचाही वाढदिवस निमित्त नरोत्तम पाटील, हिरालाल बोरदेकर, सुरेश छाजेड, सुदाम पाटील, सुदाम कोळी, व महिला दिनानिमित्ताने आलेले पाहुणे श्रीमती कांताताई पाटील, श्रीमती अलकाताई चौधरी, श्रीमती सरलाताई मराठे, यांचा ही सस्नेह सत्कार करण्यात आला.
मनोगतात जे. डि. पाटील सर,श्रीमती अलकाताई पाटील, श्रीमती कांताताई पाटील,श्रीमती सरलाताई मराठे, डि. जी. पाटील सर प्रसिद्धीप्रमुख, यांनी महिला जीवनावर विविधतेने प्रकाश टाकला. माता, पत्नी, बहीण, व कन्या, मिळून साडे तीन शक्ती पीठ होतात, महिलाच्या सबलीकरणासाठी व त्याच्या उन्नती साठी प्रयत्न करणे सर्वांचे कर्तव्य आहे हे जे. डि. पाटील.सरांनी.सांगीतलें.डी.जी.पाटीलसर यांनी "स्त्री शिवाय जीवन अपूर्ण" ही. पद्यपंक्ती म्हणून दाखवली निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती अलकाताई चौधरी यांनी संस्कारावर भर देण्याचे आवश्यक असल्याचे सूचित केले 
           कांताताई पाटील यांनी महिलांनी आधुनिक शिक्षण घेऊन समाजात वावरण्याचे सुचित केले. श्रीमती सरला मराठे यांनी कर्तबगार ताराबाई ची माहिती व पूर्वीच्या कर्तुत्ववान महिला यांची माहिती दिली. अध्यक्ष भाषणात सतीश केशव सोनवणे यांनी महिला जीवनाचे व प्रगती करण्यासाठी विविध पैलू सांगून त्यांची आर्थिक उन्नती करण्याचे आवाहन केले. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव आनंदराव विसपुते यांनी केले सभेसाठी आलेले सभासद बंधू भगिनींचे आभार मंडळाचेj उपाध्यक्ष प्रा.सखारामभाई पाटील यांनी मानले कार्यक्रमासाठी एकूण 34 सभासदांनी उपस्थिती दिली शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला