Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अल्फाबेट इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक महिला दिवस साजरा

 दि ८(प्रतिनिधी) अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील मूळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मी वळवी व मनीषा वळवी होत्या तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषा वसावे होत्या. 
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक गोटूसिंग वळवी यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, युसूफजाइ मलाला, निर्मला सीतारमन, मदर टेरेसा, प्रतिभा पाटील, राजमाता जिजाऊ, फ्लोरेन्स नाइटिंगेल, लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ, पी. टी. उषा, कल्पना चावला, सरोजिनी नायडू, किरण बेदी, रजिया सुल्ताना, बचेंद्री पाल व कविता राऊत यांच्या कामगीरीविषयी प्रतिपादन करीत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यानंतर शिक्षिका लीला पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त करीत मार्गदर्शन केले.
                 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका लीला पाडवी, प्राची पाडवी, मथुरा वसावे, मनीषा वसावे व हीराबाई वळ