Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

के.डी.गावीत माध्यमिक विद्याल वावद ता नंदुरबार येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान

 के.डी.गावीत माध्यमिक विद्यालया वावद ता नंदुरबार येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमाचे पुजन निलेश पाटील आरटीओ इन्स्पेक्टर नंदुरबार यांच्या हस्ते करण्यात आले.शरद भदाणे, मुख्याध्यापक मनोहर साळुंके उपस्थित होते.
जागतिक दिनानिमित्त समाजातील सामाजिक,राजकिय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या महिला लिलाबाई लुळे, वैशाली पाटील,रेखाबाई जाधव,मिना पाडवी,सुनंदाबाई लोणारी, कल्पना राजपुत,विमलबाई पाटील,कोकिळाबाई राजपुत यांना शाळेकडुन सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देऊन निलेश पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची वेशभुषा केलेल्या विद्यार्थीनीना सामान्यचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले.
 तर आभार प्रदर्शन सागर पाटील केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण्यासाठी गोपाल शिंदे,नितीन पाटील,सुनिल पाटील, मिनाक्षी व्यास,प्रिती नाईक,अश्विनी पाटील,पावबा ठाकरे,संजय पाटील दिपक माळी यांनी परिश्रम घेतले.