स्व. रणछोड बाबा क्रीडा मंडळ माध्यमातून सालाबादप्रमाणे 40 वर्षे वरील ज्येष्ठ खेळाडूंची क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते . या स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना पोलिस निरीक्षक राजेंद्र गावित यांनी सांगितले की वयाच्या चाळीशी नंतर देखील खेळत राहणे हे शारीरिक तंदुरुस्तीसाठी उत्तम असून साधारणता चाळीशी नंतरच विविध आजार हे जवळ येत असतात मात्र या वयात जर आपण खेळत असलो तर निश्चितच अशा आजारांपासून लांब राहण्यास मदत होणार आहे त्यामुळे ही आगळीवेगळी स्पर्धा निश्चितच गौरवास पद आहे .
अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धेच्या आयोजन करावे असे लोखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले या स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला होता यात पिंटू-१२ अमन-११ कैलास-११ वसीम-११ रामा-११ शिरीष-११ असे संघ होते साखळी पद्धतीने खेळलेल्या या स्पर्धेत अंतिम सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेत अंतिम सामन्यात कैलास इलेव्हन व अमन इलेव्हन या दोन संघात झाला अतिशय रोमहर्षक झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून कैलास-११ संघाने प्रथम फलदाजी करत निर्धारित १२ षटकात १४१ धावा केल्या यात जितेंद्र माळी यांनी अर्धशतकी खेळी केली तर दिनेश सूर्यवंशी यांनी १९ चेंडूत ३७ जलद धावा करत धावसंख्येला आकार दिला या धावांच्या पाठलाग करताना संकेत माळी २७ चेंडूत ५६ धावा तर यश मोरे याने १९ चेंडूत ५३ धावा केल्या व संघाला दोघांनी विजय मिळवून दिला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार संकेत माळी यांना देण्यात आला जलद धावा करत अमन इलेव्हन संघाला शेवटच्या षटकात विजय प्राप्त करून दिला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण तळोदा येथील पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या सर्व स्पर्धेचे पारितोषिक स्वर्गवासी ईश्वरलाल पटेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरत येथील डॉक्टर विपुल पटेल यांच्याकडून देण्यात आले होते तर सहभागी सर्व खेळाडूंना रोशन ब्रदर्स यांच्याकडून ट्रॉफी देण्यात आली स्पर्धा यशस्वीतेसाठी मनीष कलाल अनिल पाडवी धनराज मराठे प्रसाद भोगे मानसिंग राजपूत अमन ठाकरे यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमांचे सूत्र संचलन कालीचरण सूर्यवंशी यांनी केले.
डॉ शिरीष शिंदे यांनी केली वैद्यकीय तपासणी स्पर्धा सुरू असताना सर्व ज्येष्ठ खेळाडूंची निशुल्क वैद्यकीय तपासणी डॉक्टर शिरीष शिंदे व त्यांच्या पथकाने केली यात उच्च रक्तदाब रक्तातील साखर हृदयाची स्थिती अशा विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या यात ११२ खेळाडूंनी तपासणी केली होती.