Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज क्षत्रीय शिंपी समाज शहादा येथे " टेलर डे " उत्साहात संपन्न

शहादा येथे टेलर डे उत्साहात संपन्न 
 शहादा दि २ (प्रतिनिधी) श्री संत शिरोमणी नामदेव महाराज क्षत्रीय शिंपी समाज शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या सहयोगाने व कै.आप्पासाहेब बाबुराव मन्साराम शेठ चित्ते व कै.गं.भा.गंगुबाई बाबुराव शेठ चित्ते यांचे स्मरणार्थ शिवण काम करणाऱ्या शिंपी बंधूंचा सत्कार समारंभ टेलर डे शहादा येथे ज्येष्ठ नागरिक तालुका भवनात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  गोपाळराव बाबुलालशेठ शिंपी यांनी स्वीकारले कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवृत्त मुख्याध्यापक किशोर शेठ चित्ते यांनी प्रास्ताविक केले. सर्व जमलेल्या पाहुण्यांनी खरा तो एकची धर्म ही साने गुरुजींची प्रार्थना सामुदायिक रित्या म्हटली
 व्यासपीठावर श्री पुरुषोत्तम चौधरी, जे डी पाटील सर, ऍड.गोविंदभाई पाटील, गोपाळराव शिंपी, अरविंद चित्ते सुपडूभाऊ खेडकर इत्यादी विराजमान होते  
 कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व पाहुण्यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन केले. प्रथम कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समारंभ करण्यात आला नंतर टेलर काम करणाऱ्या बंधूंना शिवणकामाचे साहित्य कात्री व टेप वाटप करण्यात आले व शिवणकाम हा व्यवसाय किती महत्त्वाचा आहे याविषयी माहिती देण्यात आली. उदयजी निकुंभ, शहादा तालुका ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष जे.डी. पाटील सर. ऍड.गोविंदभाई पाटील, आनंदराव विसपुते, अरविंद चित्ते यांनी मनोगताद्वारे टेलर बंधूंना शिवणकाम विषयी मार्गदर्शन केले आणि आई-वडिलांनी आपल्यावर किती उपकार आहेत याची जाणीव करून दिली. आपल्या जन्मदात्यांनी मुलांसाठी किती कष्ट केले याची जाणीव दिली कार्यक्रमासाठी टेलर बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात पेन्शनर संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, व विविध सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ नागरिक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख डी जी पाटील सर यांनी केले. आभार प्रदर्शन अरविंद चित्ते यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला