Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नंदुरबार येथे शिक्षिकेकडे घरफोडी,२७,९०,३००/- रु. किंमतीचे सोने चांदी व रोख रक्कमेची चोरी

नंदुरबार दि२(प्रतिनिधी)  येथे शिक्षिकेकडे घरफोडी,२७,९०,३००/- रु.  किंमतीचे सोने चांदी व रोख रक्कमेची चोरी घटना दि. २८/०२/२०२५ रोजी सकाळी ११/०० ते सायंकाळी ०८५/०० वा. दरम्यान ते दि. ०१/०३/२०२५ रोजी ००/४४ वा.घटना घडली असून निता बापुराव पाटील वय-५० व्यवसाय-शिक्षिका रा. प्लॉट क्र. २०३ डिएसके अपार्टमेंट कुणालनगर नंदुरबार ता. जि. नंदुरबार यांनी फिर्याद दिली आहे.
         चोरीला गेलेला ऐवज १००/- रु.  पर्स पर्पल रंगाची, ३,८५,०००/- रु. किं.ची सोन्याची चैन त्यात मोती पोवळा असलेली वजन अंदाजे ५.५ तोळे, ३,००,०००/- रु. किं.ची सोन्याची चैन त्यात काळे मणी व गोल पँडल असलेली अंदाजे वजन ४ तोळे,२,८०,०००/- रु. किं.ची सोन्याची चैन तिला अर्धचंद्र आकाराचे सोन्याचे पँडल लाल, काळे व चॉकलेटी रंगाचे पँडलसह अंदाजे वजन ३.५ तोळे, ३,५०,०००/- रु. किं.च्या सोन्याच्या दोन पाटल्या अंदाजे वजन ५ तोळे, ६०,०००/- रु. किं.ची सोन्याची माळ अंदाजे वजन १२ ग्रॅम, ९६,०००/- रु. किं.ची सोन्याची चैन एकाआड सिल्वर, गोल्डन कडी असलेली, अंदाजे वजन १६ ग्रॅम १,३६,०००/- रु. किं.ची सोन्याची चैन, तुळशीच्या पानाच्या आकाराचे सोन्याचे पँडल असलेले पँडलसह अंदाजे वजन १९ ग्रॅम, ३८,५००/- रु. किं. चासोन्याचा मोतीहार अंदाजे वजन ११ ग्रॅम,१,५०,०००/- रु. किं.चा सोन्याचा हार बारीक मण्यांचा अंदाजे वजन ३ तोळे, १५,०००/- रु. किं.चे सोन्याचे कानातील एक जोड टॉप्स अंदाजे वजन ३ ग्रॅम,
१२,०००/- रु. किं.चे इंग्रजी S आकाराचे सोन्याचे पँडल अंदाजे वजन २ ग्रॅम, ६,०००/- रु. किं.चे दिल आकाराचे सोन्याचे पॅडल अंदाजे वजन १ ग्रॅम, २५,०००/- रु. किं.चे सोन्याचे एक जोड टॉप्स अंदाजे वजन ५ ग्रॅम,१५,०००/- रु. किं.चे सोन्याचे एक जोड टॉप्स फुलांचे डिझाईन असलेले अंदाजे वजन ३ ग्रॅम,१५,०००/- रु. किं.चे सोन्याचे एक जोड टॉप्स सोन्याचे बारीक मण्यांची डिझाइन असलेले अंदाजे वजन ३ ग्रॅम, ५०,०००/- रु. किं. च्या टॉप्सला लावण्याच्या सोन्याच्या सरी ३ जोड त्यात दोन पदरी, तिन पदरी व चार पदरी अंदाजे वजन १० ग्रॅम, २७,५००/- रु. किं.चे कानातील सोन्याचे टिक टॉक २ जोड वजन अंदाजे ५.५ ग्रॅम, २२,०००/- रु. किं.चे कानातील सोन्याचे टॉप्स एक जोड दरवाज्याच्या आकाराचे डिझाईन असलेले अंदाजे वजन ४.५ ग्रॅम,
१,४०,०००/- रु. किं.ची सोन्याची माळ, काळे व सोन्याचे मणी असलेली अंदाजे वजन २ तोळे, ४०,०००/- रु. किं.ची सोन्याची अंगठी लांबोळा लाल रंगाचा खडा असलेला अंदाजे वजन ५ ग्रॅम, ५,६००/- रु. कि.च्या चांदीच्या ४ बांगड्या अंदाजे वजन ७० ग्रॅम, १,६००/- रु. किं.ची चांदीची चैन अंदाजे वजन २० ग्रॅम, १६,००/- रु. किं. चे चांदीचे १० जोडवे अंदाजे वजन २० ग्रॅम, ७,२००/- रु. किं.चे चांदीचे पैंजण ३ जोड अंदाजे वजन ९० ग्रॅम,४,८००/- रु. किं.चे चांदीची वाटी अंदाजे वजन ६० ग्रॅम,४,०००/- रु. किं. चे चांदीची ताटली अंदाजे वजन ५० ग्रॅम,१६००/- रु. किं.चा चांदीचा चमचा अंदाजे वजन २० ग्रॅम,८००/- रु. किं.चा चांदीचा दिवा अंदाजे वजन १० ग्रॅम, २५,०००/- रु. किं.ची सोन्याची अंगठी अंदाजे वजन५ ग्रॅम,१५,०००/- रु. किं.च्या कानातील सोन्याच्या २ रिंगा अंदाजे वजन ३ ग्रॅम,१५,०००/- रु. किं.चे कानातील चंद्र आकाराचे साखळी असलेले सोन्याचे टॉप्स २ अंदाजे वजन ३ ग्रॅम,१५,०००/- रु. किं.चे कानातील सोन्याचे द्राक्ष घडाच्या आकाराचे दागीने अंदाजे वजन २ ग्रॅम,२,८०,०००/- रु. किं.चे गोल सोन्याचे त्याला काला रंग असलेले पँडल असलेली माळ अंदाजे वजन ४ तोळे,२,५०,०००/- रु. रोख रक्कम त्यात ५००, १००, ५० रु. दराच्या नोटा. बँक ऑफ महाराष्ट्र चे लॉकरची चावी व सोन्याच्या दागीन्यांच्या पावत्या.असा एकुण २७,९०,३००/- रु. एकुण किंमत असलेल्या ऐवज नमुद तारखेस वेळी व ठिकाणी यातील अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घराचे दरवाज्याचे कुलूप तोडुन घरात अनाधिकारे प्रवेश करुन घरातील बेडरुमध्ये असलेल्या कपाटाचे लॉक तोडुन लॉकरमध्ये ठेवलेले वर नमुद रोख रुपये तसेच सोन्याचे दागिने व रोख रक्कम हे फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या ईरादयाने चोरुन नेले आहे म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि संजोग बच्छाव करीत आहेत.