शहादा दि ३१ (प्रतिनिधी) शहरातील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. वसंत अशोक पाटील सुदर्शन नेत्रालय रा. लोणखेडा ता. शहादा, यांची केंद्र शासनाच्या कोळसा व खाण मंत्रालय अंतर्गत असलेल्या NLC India ltd ( केंद्रीय कोळसा व खाण मंत्रालय भारत सरकार) येथे संचालक पदी महामाहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या आदेशान्वये नियुक्ती केल्याचे .डेप्युटी सेक्रेटरी भारत सरकार यांनी अधिकृत रित्या आज दिनांक 29/03/2025 रोजी घोषित केले आहे.
यापूर्वी सुद्धा डॉ वसंत पाटील यांनी पौलाद मंत्रालय येथे संचालक म्हणून यशस्वी रित्या काम केल्यामुळे कोळसा व खाण मंत्रालया सारख्या मोठ्या जबाबदारीच्या खात्यावर पदोन्नतीने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
देश पातळीवर केंद्रीय मंत्रालया अंतर्गत संचालक म्हणून राष्ट्रपती यांचे कडून नियुक्ती होणे हा नंदुरबार जिल्ह्यासाठी व आपणा सर्वांसाठी अभिमानस्पद क्षण आहे,
डॉ.श्री.वसंत अशोक पाटील यांचे सप्तरंग फाऊंडेशन शहादा यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.