Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती संभाजी नगर शहरातील पाणी पुरवठा बाबत महानगरपालिका गंभीर नाही - आ.केनेकर

शहरातील पाणी पुरवठा बाबत महानगरपालिका गंभीर नाही - आ.केनेकर
नाशिक दि ३ (प्रतिनिधी- डॉ. शेरूभाई मोमीन,येवला,)
        छत्रपती संभाजीनगर, संपूर्ण शहरात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे व. हिंदू-मुस्लिमांच्या ऐन सणासुदीत नागरिकांची पाण्यासाठी दाहिदशा भटकंती करावी लागत आहे, यामुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
           महानगरपालिकेच्या ढिसाळ, कारभार, मनमानी, कामामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा रोष लोकप्रतिनिधिंवर निघत आहे.महापालिका प्रशासकिय विभागातील आपसातील समन्वयांच्या अभावाने ही समस्या उभी ठाकली, गेली आहे असे मत आमदार संजय केनेकर यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांनी लिहिलेल्या पत्रात, अति जलद गतीने पाणीपुरवठयाच्या समस्येवर संबंधित विभाग व. सर्वच लोकप्रतिनिधी यांची तातडीची बैठक घ्यावी अशी मागणी आ.संजय केनेकर यांनी केली आहेत.