Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सातपुड्याच्या कुशीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त "भीम जागर " कार्यक्रम संपन्न

तळोदा : सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या दहेल ता अक्कलकुवा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. या कार्यक्रमात पारंपारिक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
         सुरुवातीला पारंपारिक आदिवासी ढोल वादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.क्रांतिवीर बिरसा मुंडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन ढोल वाजत मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर मेळाव्याला सुरुवात झाली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ मनोज गावित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाजा पाडवी, प्रा.बी.के.वसावे, सरपंच बन्सीलाल वळवी, बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील पावरा,एड रणजीत पाडवी, संजय पावरा,सुनील नरवाडे, प्रा. प्रशांत बोबडे,हंसराज महाले,प्रा.अजबसिंग वसावे, एड् जितू वसावे,बुटीबई वसावे,मनीला वसावे, दिनेश पाडवी, विजया वसावे,दिनकर तडवी, रायसिंग राऊत, मगन पाडवी, सागर कापुरे छगन वसावे ब्रह्मकुमार वळवी,संदीप पाडवी, गिताबाई पाडवी,आदी मान्यवर व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
          याप्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजासाठी डॉ. आंबेडकरांसह सर्व महापुरुषांनी संघर्षाशी व संविधानात्मक तरतुदींची माहिती दिली. महापुरुषांमुळे व संविधानामुळे आपण आत्मसन्मानाचे जीवन जगत असून आपल्याला अधिक सजग राहून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा द्यावा लागेल त्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही हा बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र स्वीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादित केले.पारंपारिक पद्धतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला परिसरातील ओहवा,कुवा, कटासखाई, मोगरा,दहेल,ओढी, मोगरापाणी,वालंबा,सरी परिसरातील  पुरुष व महिला उपस्थित होते.
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. पाडवी वीरसिंग वसावे, लालसिंग वळवी,रूपसिंग वसावे बिरबल वळवी अकबर वळवी, वांगीला वळवी, दमयंती वसावे,आरशी तडवी, चंद्रसिंग वसावे मगन वसावे,भरत वसावे भीमसिंग,तडवी,दिनेश तडवी,सुनील वसावे आदीसह आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व दहेल ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. आदिवासी पारंपारिक भजन व गीतांनी कार्यक्रमात रंग भरला.

 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित काढण्यात आलेली मिरवणूक काढण्यात आली.
मेळाव्यात बोलतांना बुटीबाई वसावे,  डॉ.मनोज गावित,बाज्या पाडवी,एड.रणजीत पाडवी,प्रा.बी.के.वसावे उपस्थित होते.
अक्कलकुवा तालुक्यातील वेरी या गावी देखील पारंपारिक आदिवासी पद्धतीने डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या जयंती साजरी अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार आमशा पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.