वक्फ बोर्ड सुधारणा कायदा संसदेत बहुमताने संमत केला त्या कायद्याला विरोध म्हणून मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगाल मध्ये मुर्शीदाबाद या गावी घुसखोर व दंगेखोरांनी दंगे भडकवले आहेत. व तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर अत्याचार केल्याचा घटना समोर येत आहेत.हिंदूंच्या मालमतेचे ,दुकानांचे व प्रार्थनास्थळांची ,महिलांची विटंबना केली जात आहे.याचं घटनांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आज एकाच दिवशी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरील हिंसाचार थांबवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र सरकार व प्रशासनाने लवकर पाऊल उचलून कठोर कारवाई करावी तसेच राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी साहेबांना देखील आज श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नंदुरबार विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.