राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक आर. डी. अवचार, पोलीस उपनिरीक्षक दिनेश मधुकर तायडे, किरण बळीराम ढिवरे, आरोग्य अधिपरिचारिका सुनीता गोरख करंकाळ यांच्या मार्गदर्शनाने व सम्पूर्ण टीमच्या सहकार्याच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यशाळा राष्ट्रीय छात्र सेना विभाग, 49 महाराष्ट्र बटालियन अमळनेर, धुळे, अमरावती, अहमदनगर आंतर विभागीय जिल्ह्यातुन 417 कॅडेट्ससाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आपत्ती, आपत्तीचे धोके कसे कमी करता येतील. 
वस्तीमध्ये गॅस, इलेक्टरीक, मानवनिर्मित दंगे आग, रासायनिक द्रव्य, आपत्कालीन कारणामुळे आग लागल्यावर अग्निशामक यंत्र, फायर एक्सटिंगिशर, सर्प दंश झाल्यावर काय काळजी घ्यावी, हृदयविकाराचा झटका आल्यावर सी. पी. आर. कसा द्यावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले तसेच पूर आल्यावर घरगुती आणि टाकाऊ वस्तूपासून फ्लोटींग डिव्हाईस कसे तयार करावे, पर्सनल फ्लोटींग डिव्हाईस, लाईफ जॅकेटस वापर करून कसे बचाव कार्य करता येईल तसेच मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती आल्यावर जीवित आणि वित्तहानी कशी टाळता येईल.
त्याचे व्यवस्थापन कसे करावे. यासंदर्भात मार्गदर्शक करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष 49 महाराष्ट्र बटालियन, अमळनेरचे समादेशक अधिकारी कर्नल अमित रॉय, प्रशासकीय अधिकारी पिनाकी बनिक, नूतन माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. पाटील, सुभेदार मेजर गजे सिंग, सुभेदार धर्मेंद्र सिंग, गर्ल कॅडेट इन्स्टक्टर श्रीनिधि एम. एस., कॅम्प अड्जूएन्ट लेफ्टनंट डॉ. राजू यशोद, असोसियट एन. सी. सी. ऑफिसर लेफ्टनंट विश्वास पाटील, फस्ट ऑफिसर विकास दाभाडे, थर्ड ऑफिसर राजेंद्र आंधळे, थर्ड ऑफिसर रमेश आहेर, सुभेदार जॉन मोहम्मद, सुभेदार धिरेन्द्र प्रतापसिंग, बी एच. एम. विजेंद्र कुमार, सी. एच. एम. विक्रम निकम, सी. एच. एम. वासेकर आशिष, सी. एच. एम. प्रवीण म्हसदे, हवालदार मधुसूदन पणवार, हवालदार जगदेव रविंद्र, हवालदार यादव विठ्ठल, हवालदार दीपक पपोला, हवालदार नरेन्द्रसिंग, हवालदार राकेश कुमार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऑफिस क्लार्क सुनिल सोनार, प्रमोद भारस्कर, विक्की सूर्यवंशी राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या कॅडेट्सच्या सहकार्याने संपन्न झाला.