नंदुरबार दि १७ (प्रतिनिधी)शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद नंदुरबार मार्फत एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. नागरिकांच्या अभिप्राय, सूचना व तक्रारी सहजतेने मिळाव्यात यासाठी QR कोडच्या माध्यमातून डिजिटल संवादाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत तीन वेगवेगळे QR कोड तयार करण्यात आले आहेत :
1. Give us Feedback – नागरिकांना थेट व्हॉट्सअॅपवरून (9420166895) अभिप्राय किंवा तक्रारी पाठवता येतील.
या उपक्रमाचे नेतृत्व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावन कुमार यांनी केले असून, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांशी अधिक सुलभ संवाद साधणे हा यामागचा उद्देश आहे.
नागरिकांनी वरील QR कोड स्कॅन करून आपले अभिप्राय, सूचना अथवा तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा परिषद नंदुरबारच्या वतीने करण्यात आले आहे.