Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

योगशिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांची फेरनियुक्ती

नंदुरबार दि २२(प्रतिनिधी) येथील जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सेंट मदर तेरेसा योग विद्याधामचे केंद्रप्रमुख डॉ. संजय शिंदे यांची महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार व राज्य कार्यकारिणीने योगशिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यपदी फेरनियुक्ती केली आहे. 
       डॉ. शिंदे यांनी पीएच.डी (शिक्षणशास्त्र), पीएच.डी (मराठी), एम.ए (कम्युनिकेशन), एम.ए. (योगशास्त्र) शालेय व्यवस्थापक पदविका, योगशिक्षक पदविका, समंत्रण पदविका अशा विविध विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. "नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या ताण-तणाव व्यवस्थापनासाठी योगाभ्यासाच्या परिणामकारकतेचा अभ्यास" या विषयावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपूर विद्यापीठातून संशोधन कार्य केले आहे. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय नियतकालिकांमधून शंभरपेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहे. त्यांच्या फेरनियुक्तीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शोभा मोरे, उपाध्यक्ष डॉ विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे,ॲड.राऊबाबा मोरे प्राचार्य डॉ. सतीश देवरे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. मनोज निलपवार (यवतमाळ) डॉ. संजय ढोले (पुणे), डॉ. योगेश कुलकर्णी (नाशिक), डॉ. राजेश पाटील जळगांव, डॉ. जितेंद्र भामरे (धुळे), डॉ. श्रीकांत वाडिले (शिरपूर), डॉ. योगेश नांद्रे (पिंपळनेर), योग शिक्षक संघाचे महासचिव शांताराम पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील योगप्रेमी, योगशिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.