मुरबाड दि २६ (प्रतिनिधी )सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सरनोबत यांनी राज्य परिवहन महामंडळात २२ वर्षे नित्यनियमाने सेवा केली.परंतू ते वयाच्या अटीवर सन २०१५ मध्ये सेवा निवृत्त झाले.नियमानुसार त्यांना निवृत्ती वेतन मिळाले पाहिजे.परंतू रिटायर्ड होऊन १० वर्षे कालावधीनंतरही अद्याप त्यांना निवृत्ती वेतन मिळत नाही.
त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.निवृत्ती वेतन मिळावे म्हणून त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे असंख्य पत्रव्यवहार केला.राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ,एसटी महामंडळाचे सचिव यांना पत्रव्यवहार केला आहे.
परिवहन महामंडळाकडे भरपूर फे-या मारल्या.तरीही त्यांना पेन्शन मिळेना.म्हणून त्यांनी आता मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे व आयोगाकडूनही न्याय न मिळाल्यास राज्य परिवहन महामंडळासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा राजाभाऊ सरनोबत यांनी दिला आहे.