फिर्यादी नितीन माधवराव धनगर व साक्षीदार हिरालाल भिकन पाटील रा. ढंढाणे ता. नंदुरबार असे सुदर्शन सेक्युरिटीचे कंपनीचे वतीने ढंढाणे ता. नंदुरबार शिवारातील सुझलॉन कंपनीचे टॉवर क्र. के- ४९० येथे सेक्युरिटीची डुयटी करत असतांना ०८ ते १० आरोपीतांनी पायी पायी त्या ठिकाणी येवुन त्यातील ४ ते ५ चेहरा रुमालाने झाकलेला असलेले आरोपी हे फिर्यादी यांचे जवळ आले त्यापैकी दोन आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार हिरालाल भिकन पाटील यांचे मानेवर कोयता ठेवुन तुम्ही आवाज केला तर तुम्हाला येथेच मारुन टाकु असा धाक दाखवुन गप्प बसण्यास सागुन फिर्यादीचे खिशातील ८५००/- रु. रोख बळजबरीने काढुन घेतले व सोबतच्या ४ ते ५ आरोपीतांनी टॉवर क्र. के- ४९० चे कुलुप करवत व मोठी लोखंडी कैचीच्या सहाय्याने तोडुन त्यातील २२ किलो एल. टी. कॉपर केबल अंदाजे कि. १९४२०/- रु. बसबार पॅनल अंदाजे ४५०००/- रु. किंमतीचा असा एकुण ७२९२०/- रु. कि. मुद्देमाल बळजबरीने चोरुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले बाबत तक्रारदार यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी नपोनि / सुनिल भाबड करीत आहेत.