Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एस.जे.पाटील यांचे स्वलिखित पुस्तक "वंशावळी" चे प्रकाशन व गुणवंतांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न


नंदुरबार  दि २८(प्रतिनिधी) एस.जे. पाटील सेवानिवृत्त शिक्षक जिजामाता माध्यमिक विद्यालय धुळे,यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी आपण आपल्या विखरण गावासाठी काही देणं लागतो.या निस्वार्थ हेतूने व आपल्या गावाच्या विकासासाठी, शाळेसाठी उत्तम काम करणारे लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या कार्याची दखल घेत कार्यरत व आजी माजी लोकप्रतिनिधी व श्री‌.आप्पासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक वर्गाचा गुणगौरव केला. 
          एस.जे.पाटील सेवानिवृत शिक्षक यांनी विखरण गावाच्या विकास कार्यात सहभागी होणाऱ्या आजी-माजी सरपंच पोलीस पाटील माजी पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांचा गुणगौरव आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यालयात संपन्न करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यमान सरपंच भारती केशव पाटील तसेच कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून साप्ताहिक समर्थ शक्तीचे संपादक राजू पाटील मंगलाताई पाटील, दीपक कुलकर्णी जिल्हा प्रतिनिधी दैनिक सकाळ प्रमोद पाटील प्रतिनिधी,दैनिक सकाळ शांताराम पाटील,वार्ताहर दैनिक सकाळ यांच्या उपस्थितीत पार पडला. 
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जे. पाटील यांनी मांडले त्यात मागील पंचवीस वर्षात विद्यालयाने विविध अंगी केलेली प्रगती,ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवून 'मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा' या उपक्रमात तालुक्यातून प्रथम तसेच हरित विद्यालय,लोकवर्गणीतून डिजिटल शाळा बनविताना कर्मचारी वर्गाने केलेल्या ज्ञानदानातून व परिश्रमातून उपक्रमशील शाळा म्हणून पुढे येत आहे.म्हणून तसेच विखरण गावात विविध योजनांद्वारे गावाचा विकास होत आहे. त्या हेतूने हा सत्कार समारंभ करण्यामागील माझा उद्देश आहे. या शब्दात प्रास्ताविक मांडले. एस.जी.पाटील यांचे जीवन कार्याचा परिचय देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी दिला.तसेच एस.जे.पाटील लिखित 'रेशीमगाठ' या आत्मचरित्रपर साहित्याविषयी माहिती दिली.या कार्यक्रमात एस.जे.पाटील लिखित सुर्यवंशी परीवाराचा इतिहास,मठ,मढीची माहिती पुस्तिका 'वंशावळी' मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.गुणगौरव कार्यक्रमात समर्थ शक्ती साप्ताहिकाचे राजू पाटील,दीपक कुलकर्णी,जिल्हा प्रतिनिधी सकाळ प्रमोद पाटील सकाळ प्रतिनिधी, देवरे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके,सी.व्ही.नांद्रे,
डी. बी.भारती,एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, एस.एच. गायकवाड, एम.एस.मराठे, ए.एस.बेडसे,आर. आर.बागुल,डी.बी. पाटील,एस.जी.पाटील यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ, शॉल,देऊन तसेच विखरण गावाच्या विकासात भूमिका बजावणाऱ्या आजी-माजी सरपंच,पं.स. सदस्या,पोलीस पाटील तसेच पदाधिकारी, भारती केशव पाटील,छाया बापू पाटील,निर्मला रोहिदास साळुंके,रवींद्र गुलाब पाटील,से.नि. लिपिक रवींद्र मोतीराम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद ज्ञानेश्वर पाटील, अभियंता तुषार कृष्णा साळुंके, केशव वामन पाटील,रोहिदास बारकू साळुंके, चुडामन राजाराम पाटील,भटू नारायण पाटील, चुडामन पंडित पाटील,विजय साहेबराव पाटील, पोलिस पाटील एड. दीपमाला प्रकाश पाटील,भाजपा तालुका अध्यक्ष, दीपक पाटील यांना शाॅल,पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.यावेळी समर्थ शक्ती साप्ताहिकाचे संपादक राजू पाटील व परिवार यांनी एस.जे.पाटील सरांना सन्मानित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी.भारती व आभार सी.व्ही. नांद्रे यांनी मानले.