तळोदा दि २६ (प्रतिनिधी) पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी.डी.माने (दिवानी न्यायाधीश) होते.मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम मुख्याध्यापक जे एल सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.प्रास्ताविक एन जे.लोखंडे, सुत्रसंचालन एम.डी.जावरे यांनी केले.आर.आर.मगरे (सरकारी वकिल),सी.बी.आगळे( तालुका वकील सघांचे वकिल),उपमुख्याध्यापक जे.एन.माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.उपस्थितांना अंमली सेवन करणार नसल्याची शपथ देण्यात आली.
आभारप्रदर्शन जे.डी.देवरे यांनी केले. याप्रसंगी,सी.बी.आगळे (तालुका वकिल संघाचे सचिव),जे.आर.धनगर,ए.आर.वरकर,एस.आर.गिरासे
(कनिष्ठ लिपिक),उपमुख्याध्यापक जे.एन.माळी ,पर्यवेक्षक पी.पी.पाटील तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.