Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उबाठा पक्षामार्फत ज्येष्ठ शिवसैनिक, माजी सैनिक, शेतकरी यांचा सत्काराचे आयोजन

नंदुरबार दि.१९ (प्रतिनिधी) शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उबाठा पक्षामार्फत महानगर प्रमुख पंडित माळी यांचा कार्यालयात ज्येष्ठ शिवसैनिक, माजी सैनिक, शेतकरी बंधू यांचा सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व तसेच जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
            शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, महानगर प्रमुख नंदुरबार जिल्हा पंडित माळी, तालुका प्रमुख रमेश पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक डॉ.हेमंत शर्मा, उप तालुका प्रमुख सुनील पवार, उप शहर प्रमुख खंडू माळी ,शहर संघटक भक्तवत्सल सोनार, युवासेना उपजिल्हा अध्यक्ष सागर पाटील ,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष राज पाटील, सोशल मीडिया समन्वयक आनंद पाटील, शहर अधिकारी दादा कोळी, शहर समन्वयक अक्षय श्रीखंडे, वाहतूक सेना उपजिल्हा अध्यक्ष छोटू चौधरी, रवींद्र देसले, आनंदा पाटील, जाफर शाह, बापू गवते, बबलू नागर, राजू पठाण व कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.