Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अक्कलकुवा येथे जागतिक आदिवासी गौरव दिनाच्या आयोजनासाठी नियोजन बैठक संपन्न


कोलवीमाळ दि (प्रतिनिधी) येणाऱ्या ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने अक्कलकुवा येथे एक विशेष नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीचे आयोजन आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी रूढी परंपरा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
      बैठकीत उपस्थित मान्यवरांनी, आजच्या काळात आदिवासी समाज विविध व्यसनांच्या गर्तेत ओढला जात असल्याची चिंता व्यक्त केली. त्यामुळे समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती अभियान आणि पारंपरिक संस्कृती व गौरवशाली इतिहास जनमानसात पोहोचविण्यासाठी प्रभावी कार्यक्रम राबवण्याची गरज असल्याचे एकमताने ठरविण्यात आले.

यावेळी आदिवासीचे नेते नागेश पाडवी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, "समाजातील नव्या पिढीला आपल्या आदिवासी संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे आणि व्यसनमुक्त आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवले पाहिजे."त्यासाठी ९ ऑगस्टच्या गौरव दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम, प्रबोधन रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येईल.

या नियोजन बैठकीस मोठ्या संख्येने आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे,माजी उपसरपंच जगदीश वसावे,माजी पंचायत समिती सदस्य किशोर पाडवी,माजी सरपंच किसन नाईक, सरपंच भूपेंद्र पाडवी,
माजी सरपंच सुनील राव,
विशाल तडवी, रत्नजीत वळवी, विलास पाडवी,मुकेश वसावे, माजी सरपंच आपसिंग वसावे,ज्येष्ठ कार्यकर्ते जयपाल वसावे,उपसरपंच सुरेश वसावे (कौलीगव्हाण),माजी पंचायत समिती सदस्य मणिलाल तडवी,माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश पाडवी,तुळशीराम वसावे, रामसिंग वसावे, योगेश वसावे,राजू पाडवी, मनोज पाडवी, वैभव पाडवी,भुषण पाडवी, अमरदीप पाडवी,मनोज गावीत, रविकांत पाडवी, बाबुभाई तडवी,हिरालाल वळवी, विजय गावीत, देविसिंग पाडवी,प्रमोद तडवी, अविनाश पाडवी, राहुल पाडवी,रमेश तडवी, कांताबाई तडवी, सुपा नाईक,पिनू वळवी, राहुल वसावे आदींचा समावेश होता.

बैठकीत सर्वांनी एकमताने ९ ऑगस्ट रोजी विविध उपक्रम राबवून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा निर्धार केला. युवकांमध्ये जनजागृती आणि व्यसनमुक्ती मोहिम राबवण्यासाठी स्वतंत्र समिती तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.