नंदुरबार दि १०(प्रतिनिधी) के.डी.गावीत माध्यमिक विद्यालय वावद येथे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रमानिमित्त महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन मिनाक्षी व्यास यांनी केले.मुख्याध्यापक मनोहर साळुंके उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.विद्यार्थ्यांनी गुरुप्रति कृतज्ञता म्हणुन शाळेतील शिक्षकांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.शाळेतील एकूण 30 विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरे विषयी माहिती दिली. जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल गुरुंशिवाय पर्याय नाही,त्याच्यामुळे प्रत्येकाने गुरुंचा आदर करावा व जीवनात उच्च ध्येय गाठावे असे आवाहन मनोहर साळुंके यांनी केले.
सागर पाटील यांनी पौरोणिक दाखले देऊन गुरु-शिष्य परंपरेविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलोनी जाधव, भावना गवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वामिनी पाटील हिने केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला गोपाल शिंत्रे,नितीन पाटील ,सुनिल पाटील, प्रिती नाईक,आश्विनी पाटील,पावबा ठाकरे,संजय पाटील,दिपक माळी उपस्थित होते.