कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी डी पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त मुख्याध्यापक जि. प. हरिचंद्र ठाकरे हे होते . कार्यक्रमात मुलांनी गुरु विषयी आदर व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले . प्रमुख पाहुण्यांनी संत परंपरा व गुरूंचे महत्व याची माहिती दिली .प्रा एस.आर.माळी प्रमुख वक्ते यांनी विविध पौराणिक दाखले देत गुरुपौर्णिमे विषयी मार्गदर्शन केले . तसेच , प्राचार्य बी डी पाटील यांनी महर्षी व्यास यांच्या जिवन कार्याविषयी माहिती देताना विविध उदाहरणे देत गुरुपरंपरा समजावले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी जी राजपुत, आभार जी के पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.