Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

के डी गावित माध्यमिक विद्यालय ठाणेपाडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

नंदुरबार दि १८(प्रतिनिधी)के डी गावित माध्यमिक विद्यालय ठाणेपाडा  येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली  बी.डी. पाटील  यांनी शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
          त्या नंतर प्रमुख अतिथी कवी बाबुराव गणपत सोनवणे जवखेडे कर यांनी आपल्या अहिराणी भाषेत शिक्षणाचे महत्त्व गाण्यातून मुलांना पटवून दिले. बोली भाषेतून पाण्याचे महत्व पाणी आडवा पाणी जिरवा तसेच हगणदारी मुक्त गाव ,व्यसनमुक्ती, आदर्श गाव ,शाळा आपली शाळा ,याबाबत सखोल मार्गदर्शन केले बी.डी .पाटील यांनी अहिराणी भाषेतून भाषेतून विद्यार्थ्यांना संबोधन केले.
 इयत्ता आठवी ते दहावीचा विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेतून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडले. सूत्रसंचालन एन एस पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.