संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येथील श्री. संत सावता माळी युवा मंच यांच्या वतीने येथील माळी समाज मंगल कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आमदार राजेश पाडवी यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. शिबिरात यावेळी अनेक पती-पत्नीचा जोडप्यांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्त संकलित करण्यासाठी धुळे येथील नवजीवन ब्लड बँकचे डॉ. सुनील चौधरी, रक्तपेढी तंत्रज्ञ रोहिदास जाधव, गजानन चौधरी, चंद्रकांत दंडगव्हाण, पांडुरंग गवळी, सनम वळवी, योगेश पाटील, रोशन निकम तसेच नंदुरबार येथील जनकल्याण ब्लड बँकचे अर्जुन लालचंदानी, किशोर तांबोळी, आकाश जैन, खलील काजी, शेखर पाटील, मधुसूदन वाघमारे, मनिषा वळवी, गौडा पावरा आदींनी सहकार्य केले.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी माळी समाज बांधवांनी विशेषतः युवकांनी तसेच माळी समाज पंच मंडळ, माळी समाज महिला मंडळ, श्री. संत सावता माळी युवा मंचच्या सर्व युवकांनी तसेच श्री. क्षत्रिय माळी नवयुवक मंडळ, अण्णा गणेश मंडळ व काका गणेश मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
एकूण २ हजार ४६८ दात्यांचे रक्तदान -
येथील श्री. संत सावता माळी युवा मंचाकडून २०१५ पासून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून पहिल्या वर्षी २२३ दात्यांनी, २०१६ मध्ये २९४ दात्यांनी, २०१७ मध्ये ३३६ दात्यांनी, २०१८ मध्ये ३०३ दात्यांनी, २०१९ मध्ये २८६ दात्यांनी, २०२१ मध्ये १११ दात्यांनी, २०२२ मध्ये २४० दात्यांनी, २०२३ मध्ये २१६ दात्यांनी, २०२४ मध्ये २१८ दात्यांनी तर यावर्षी २४१ रक्तदान केले. श्री. संत सावता माळी युवा मंचाकडून आयोजित रक्तदान शिबिरात गेल्या अकरा वर्षात तब्बल २ हजार ४६८ दात्यांनी रक्तदान केले आहे.