Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जी. टी. पाटील महाविद्यालयात विज्ञान कथा दिवस व विज्ञान मंडळाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न


 जी. टी. पाटील महाविद्यालयात विज्ञान कथा दिवस व विज्ञान मंडळाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न 

नंदुरबार दि २१(प्रतिनिधी) जी टी पाटील महाविद्यालय व मराठी विज्ञान परिषद नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान कथा दिवस हा जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान कथा लेखक स्वर्गीय प्रा.जयंत नारळीकर यांनी विज्ञान कथेला साहित्यिक मूल्य प्राप्त करून दिले आहे यांमुळे त्यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात आला. सदर दिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विभाग प्रमुख माननीय प्रा. डॉ संजय ढोले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
          त्यात त्यांनी पद्मविभूषण प्रा. जयंत नारळीकर यांच्या कार्याचा गुणगौरव करून विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी असे आवाहन करून विज्ञान मराठीत कशा पद्धतीने शिकता येईल याच्यावरही आपले विचार मांडले. माननीय प्रा. संजय ढोले यांनी विद्यापीठात विविध पदावर काम केलं आहे. तसेच त्यांनी आतापर्यंत 28 विज्ञान कथाचे आतापर्यंत लिखाण केले आहे. सदर औचित्य साधून त्यांच्या हस्ते महाविद्यालयातील विज्ञान मंडळाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न ता वि समितीचे चेअरमन मा आमदार भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी होते त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व तंत्रज्ञान चा वापर मानवाच्या विकासासाठी,प्रगतीसाठी करावा असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विज्ञान परिषद मुंबई विभाग नंदुरबार याचे अध्यक्ष मा प्रा. बी. एस. पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून न ता वि समितीचे व्हाइस चेअरमन मा बाळासाहेब मनोजजी रघुवंशी, न ता वि समितीचे संचालक मा बी के पाटील, दिलीप जैन,परवेज खान, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य क ब चौ उमवी जळगाव आदरणीय डॉ. एम. जे रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ.एम एस रघुवंशी व उपप्राचार्य डॉ. एस पी पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधव कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान मंडळाचे प्रमुख डॉ.जी. आर. गुप्ता यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुणवत्ता विभागातील डॉ एम आर पाटील, डॉ योगेश मराठे डॉ अनिल कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते