नंदुरबार दि २२(प्रतिनिधी)राज्यातील परिचारिकांच्या विविध मागण्या वेतन त्रुटी निवारण अधिपरिचारिका परिसेविका व पाठ्यनिर्दशिका या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे .राज्यातील परिचारिकांना केंद्रशासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता 7200/, गणवेश भत्ता 1800 ,मंजूर करावा व पात्र परिचारिकांना शैक्षणिक भते मंजूर करावे परिचर्या संवर्गाचे 2021 मधील नव्याने मंजूर केलेले .सेवा प्रवेश नियमांमध्ये अनेक त्रुटी आहेत त्यात दुरुस्ती कराव्यात .पदनाम बद्दल केंद्रशासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामा मध्ये बद्दल करण्यात यावा.
परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्याना बदली धोरण 2018 मधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली करावी .राज्य शुश्रूषा सेल स्थापन सक्षम करून परिचारिकांचे संवर्गाचे 3 प्रतिनिधी व सर्व पदे भरावीत .राज्यातील सर्वच संस्थांमध्ये परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान अपुरे व खूप जुने आहेत .नवीन निवासस्थान उपलब्ध नसल्यास निवासस्थानाऐवजी देय असलेल्या अतिरिक्त घरभाडे भता देण्यात यावा .बायोमेट्रिक हजेरी परिचारिकांना बायोमेट्रिक प्रणालीमधून वगळण्यात यावे . अशा अनेक प्रकारचे मागण्या संदर्भात जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या बेमुदत संपाला परिचरिका संघटनेला विश्व आदिवासी सेवा संघटनेने पाठिंबा दर्शवीला आहे.
यावेळी उपस्थित संघटनेचे केंद्रीय संस्थापक तथा अध्यक्ष जितेंद्र टी बागुल केंद्रीय सचिव संभाजी आर जगताप केंद्रीय सहसचिव विनायक के गावीत केंद्रीय सल्लागार कोमल जे पावरा केंद्रीय कोषाध्यक्ष गुलाब एस गावीत केंद्रीय सदस्य सुभाष जी कोकणी केंद्रीय सदस्य सोनू एस पाडवी महाराष्ट्र प्रदेश सचिव किशोर बी पावरा महाराष्ट्र प्रदेश सदस्या नलिनी जे बागुल धडगाव तालुका सल्लागार ऍड गीतांजली वाय पाडवी नंदूरबार तालुका अध्यक्ष दिनेश जी सोनवणे धडगाव तालुका अध्यक्ष कालूसिंग डी वळवी नंदुरबार तालुका सचिव सतिष पी भुसावरे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र जी तडवी धुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुणाल एस गावीत सदस्य किशोर गवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत व पदाधिकारी उपस्थित होते .