सभेला ३५० सदस्यांच उपस्थिती होती. सभेला नंदुरबार येथील आई-वडील व पालक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बारकू नवल पाटील पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष इंदवे नाना, माळी समाज पंचचे अध्यक्ष अनिल माळी, सचिव हिरालाल कर्णकार यांनी बहुमोल मार्गदर्शन केले सभेला आलेल्या सभासदांचे अध्यक्ष रविंद्र मगरे यांनी स्वागत केले. दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
इतिवृत्ताचे,संघाचा जमाखर्च, तेरीज पत्रक, ताळेबंद सहकोषाध्यक्ष दिलीप गिरनार यांनी वाचन केले. संघाच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ८० वर्षावरील जेष्ठांचा सत्कार करण्यात आला. डॉ. विजय पाटील व डॉ. संगीता पाटील (पुसनदकर ) यांच्या ठेवीच्या व्याजाच्या रकमेतून तुकाराम नारायण पाटील यांच्या नावाने संघाचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम मोतीराम कलाल (गुरुजी) व कै. आप्पासाहेब महादू सिताराम पाटील (माजी अध्यक्ष )यांना मरणोत्तर 'आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार व सन्मानपत्र' त्यांचे नातेवाईक धनंजय कलाल व श्रीमती विमलताई पाटील यांना प्रदान करून सत्कार करण्यात आला. सभाध्यक्ष रविंद्र मगरे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सभेला नरेंद्रभाई पाटील (आमलाड),चुनीलाल मुरार सूर्यवंशी,.यु जी पिंपरे, अरुण मगरे ,.विष्णुपंत मुरार सूर्यवंशी,.एन.डी.माळी,श्रीमती विमलाताई पाटील, धनंजय कलाल, सौ.भावना कलाल,गिरीधर सागर, भिका ठाकरे,.ऐ.व्ही वाणी संघाच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्य व सल्लागार मंडळ उपस्थित होते.
सभा संपल्यानंतर भोजन व्यवस्थेचा व अन्नदानाचा आर्थिक भार सामाजिक कार्यकर्ते हाजीनिसार अली शेरमहंमद मक्राणी व किर्तीकुमार चंदुलाल शहा यांनी उचलला. संघाध्यक्ष रविंद्र मगरे व सौ.हंसाबाई रविंद्र मगरे यांनी विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस वितरणासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये चा धनादेश दिला. सूत्रसंचालन सचिव काशिनाथ राठोड व सदस्य ईश्वरलाल रामा मगरे,आभार ऐ.डी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.