Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कुटुंबाप्रती आपण सजग रहा, प्रत्येकला समजून घ्या, त्यामुळे कुटुंब एकसंघ राहील- अखिल महाराष्ट्र जेष्ठ नागरिक संघाचे विभागीय संचालक तथा निवृत्त वकिल गोविंद पाटील

शहादा- वडाळी दि २२(प्रतिनिधी) कुटुंबाप्रती आपण सजग असताना काही शुल्लक कारणांने मनात क्लेश तयार होतात यासाठी त्यांचे म्हणणे समजून घ्या जेणेकरून तुमचा सन्मान कमी होणार नाही कुटुंब एकसंघ राहील असे प्रतिपादन अखिल महाराष्द जेष्ठ नागरिक संघाचे विभागीय संचालक तथा निवृत्त वकिल गोविंद पाटील यांनी केले.
कोंढावळ ता.शहादा येथे समता जेष्ठ नागरिक संघाच्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी फेस्कॉमचे विभागीय संचालक रामजी पाटील निवृत्त प्राचार्य शरद पाटील जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण समता जेष्ठ संघाचे माजी अध्यक्ष साहेबराव गोसावी, कवी निवृत्त शिक्षक मोहन पाटील,फुलसिंग भील, भगवान माळी,मोतीलाल माळी यासह संघाचे महिला सदस्या सह सदस्य उपस्थित होते रामजी पाटील यांनी जेष्ठ नागरिक संघाचे कार्य, उदिष्टे लाभांच्या मिळणाऱ्या योजना बाबत लागणारे कागदपत्र या बाबत सविस्तर माहीती दिली कवी मोहन पाटील यांनी सभेप्रसंगी उपस्थितांवर कविता रचून सादरीकरण केल्यामुळे जेष्ठ नागरिक आनंदीत झाले यावेळी समता जेष्ठ नागरिक संघाच्या नूतन अध्यक्ष म्हणून श्री. काशीनाथ मुकुंदा माळी यांची निवड करण्यात आली कार्यक्रमांचे प्रास्ताविक माजी अध्यक्ष साहेबराव गोसावी यांनी केले तर सुत्रसंचालन आभार प्रताप चव्हाण यांनी मानले