नंदुरबार दि २५ (प्रतिनिधी) मुंबई पत्र सुचना कार्यालय
विभागातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांसाठी वार्तालाप माध्यम परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्याकडून शाश्वततेकडे ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत जिल्ह्यातील ५३ पत्रकार सहभागी चे झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी साभाळणाऱ्या हे महाराष्ट्राभरातील अधिकाऱ्यांशी संवाद इत साधण्यात आला.
या परिषदेचे उद्घाटन सत्रात भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे, पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाचे संचालक सय्यद रबीहाश्मी आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी उपस्थित होत्या. पत्रसूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या सहाय्यक संचालक निकिता जोशी यांनी प्रास्ताविकेतून माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचा उद्देश मांडला. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे यांनी उद्घाटन सत्राला संबोधित केले. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनीही मनोगत व्यक्त केले. पत्रकार हे नागरी प्रशासनाचे कान आणि डोळे असल्याचे म्हणत, या अनुषंगाने पत्रकारांची महत्वाची भूमिका त्यांनी मांडली. पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाचे संचालक सय्यद रबीहाश्मी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.
पत्रकारितेच्या क्षेत्रात १.५५ लाखांहून अधिक प्रकाशने आणि ९०० पेक्षा जास्त दूरचित्रवाणी वाहिन्यांचा समावेश असून, पत्रकारांच्या एवढ्या मोठ्या विश्वाला सरकारशी जोडण्यात वार्तालाप सारखा उपक्रम महत्वाची भूमिका बजावत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. परिषदेची सुरुवात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाचे प्रादेशिक व्यवस्थापक अजित वाच्छानी आणि ट्रायफेडचे आदिवासी लाभार्थी यांच्यातील 'भविष्य घडवतानाः आदिवासी नवोन्मेष आणि विपणनाद्वारे रोजगारनिर्मिती' या शीर्षकाच्या परिसंवादाने केली. त्यांनी माहिती दिली की नंदुरबारमध्ये ११ वनधन विकासगट मंजूर झाले आहेत. सरकारी योजनेअंतर्गत होत असलेल्या चांगल्या ब्रँडिंगमुळे त्यांच्या गटातील समुदायांना आपली आदिवासी उत्पादने ट्रायफेडच्या माध्यमातून सहा पट अधिक नफ्यात कशी विकता आली आहेत, हे लाभार्थ्यांनी सांगितले. एका लाभार्थ्याने मुंबई, दिल्ली, नागपूर आणि इतर शहरांमधील विविध स्टॉलवर मोहाचे लाडू आणि अळंबी उत्पादने कशी यशस्वीरित्या विकली गेली आणि देशभरात प्रसिद्धी कशी मिळाली, याबद्दलच्या आठवणी सांगितल्या. या योजना महाराष्ट्र राज्य सरकारच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या समन्वयाने राबविल्या जातात. या परिसंवादाचे सूत्रसंचालन पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या प्रसारमाध्यमे आणि संपर्क अधिकारी सोनल तुपे यांनी केले. नंदूरबारचे प्रमुख व्यवसाय निरीक्षक संदीप कुमार गुप्ता आणि प्रमुख वस्तू कारकून प्रमोद ठाकूर यांनी पश्चिम रेल्वेच्या एक गाव, एक उत्पादन उपक्रमाची माहिती दिली. पीआयबीच्या सहायक संचालक निकीता जोशी आणि माध्यम व जनसंपर्क अधिकारी सोनल तुपे यांनी पत्र सूचना कार्यालयाचे कार्य व सेवा यांची ओळख सादरीकरणाच्या माध्यमातून सांगितली. या सत्रात पत्रकारांच्या वार्तांकनामधली पीआयबीची सहायकाची भूमिका विशद करण्यात आली.