विखरण दि २५ (प्रतिनिधी) नंदुरबार तालुक्यातील श्री. आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विविध विद्यार्थ्यांनी आकर्षक भारतीय पेहराव करून विविध ग्रामीण, आदिवासी भागातील सण उत्सवांवर आधारित नृत्यावर कलाविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.खोंडामळी केंद्राचे केंद्र प्रमुख आनंदराव करनकाळ यांनी परीक्षण केले.लहान गटातून इ.पाचवी ते सातवी मधून प्रथम,संध्या भरत भील,द्वितीय धनश्री सचिन पाटील तर तृतीय दीपिका विकास भिल व अक्षरा सोपान पाटील तसेच मोठ्या गटातून इ.आठवी ते दहावी मधून प्रथम देवर्षी काशिनाथ पाटील, द्वितीय हर्षदा प्रकाश शिरसाठ,गायत्री भटु लोहार तृतीय क्रमांकाने तर मुलांच्या गटातून प्रथम विकास विलास बोंढारे, द्वितीय आदित्य, सुनील पाटील तर भावेश विकास पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वितांना केंद्र प्रमुख आनंदराव करनकाळ व मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक व्ही.बी.अहीरे यांनी केले.