तळोदा दि ३१(प्रतिनिधी)तालुक्यातील प्रतापपूर केंद्राची शिक्षण परिषद विद्यावर्धनी आदिवासी आश्रम शाळा रांझणी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांझणी, केलीपाणी पाटीलपाडा, थेवापाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती .
या शिक्षण परिषदेचे अध्यक्ष म्हणून प्रतापपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती रंजना निकुंभे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रांझणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिताताई पाडवी, मुखाध्यापक एच . एम .कुवर होते . तसेच केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन, स्वागत गीत, आदिवासी गाणी सादर करण्यात आले . सहभागी विद्यार्थांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून केंद्रप्रमुख रंजना निकुंभे व किशोर भारती यांच्याकडून बक्षीस देण्यात आले विद्यार्थांचे कौतुक करण्यात आले . मागील मासिक शिक्षण परिषदेचा मागोवा व प्रशासकीय विषयांचे मार्गदर्शन करुन काही विषयाबद्दल केंद्रप्रमुख रंजना निकुंभे यांनी सूचना दिल्या . अध्ययन निष्पत्तीवर आधारीत आदर्श पाठाचे सादरीकरण उज्वला गायकवाड यांनी केले . परख २०२४ चा जिल्हयांचा शैक्षणिक अहवाल भिमसिंग वळवी यांनी सादर केला . शाळा स्तरावर विविध समित्यांचे एकत्रीकरण बाबत शासन निर्णय १६ एप्रिल २०२५ बद्दल धिरसिंग वसावे यांनी सविस्तर माहिती दिली . माझे वर्ग माझे माझे नियोजनची सविस्तर माहिती देऊन दिनेश सोनवणे व रविंद्र पवार यांनी गटागटाने सादरीकरण करून घेतले . केंद्र स्तरावर शैक्षणिक गरजांवर आधारीत माहिती प्रतिभा भामरे यांनी दिली . अमेरिकन इंडिया फाऊंडेशन संस्थेचे स्वप्नील नगराळे व गणेश वसावे यांनी व्दिभाषिक प्रकल्प बाबत माहिती दिली . व्दिभाषिक प्रकल्पातील पुस्तकांचा उद्देश, त्यांचा उपयोग, विद्यार्थी जीवनातील बदल, फायदे याबाबत अधिक माहिती दिली .
या शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन चंद्रकांत सपकाळे अनुमोदन प्रकाश ठाकरे तर उपस्थितांचे आभार विजय बोरसे यांनी मानले . शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी प्रकाश कोकणी, शिवदास कोकणी, रविंद्र वसावे, दिपक गावीत यांनी परिश्रम घेतले . मनोरंजक, खेळीमेळीच्या वातावरणात, पाऊसाच्या सरीत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .