शहादा दि ४ (प्रतिनिधी) शहादा आगारातील शहादा–कहाटूळ मार्गे धावणाऱ्या सर्व बसेसला मोहिदा ता.शहादा येथील ग्रामीण रुग्णालय येथे थांबा देण्यात यावे करिता शहादा तालुका शिवसेने वतीने तालुका प्रमुख मनलेश जायसवाल यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिका तर्फे शहादा आगारातील (एस.टी.डेपो) आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे की,शहादा ग्रामीण रुग्णालय हे शहादा शहरापासुन सुमारे ७/८ किलोमीटरवर लांब अंतरावर मोहिदा शिवारात असल्याने शहादा येथील रुग्णांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सह वेळेचा अपव्यय होत असल्याने प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत आहे.तसेच रुग्णालयातील संबंधित कर्मचारी वेळेवर पोहचत नसल्याने रुग्णांना वेळेवर सेवा देण्यात व्यत्यय येत आहे.तसेच रुग्णांना व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पोचण्याकरिता रिक्शा(तीनचाकी)आधार घ्यावे लागत आहे.परंतु रिक्षा चालक-मालक ३००/४०० रुपये भाडे आकारत असल्याने रिक्षाने ये-जा करणे परवडणारे नाही.शहादा आगारातील शहादा-कहाटूळ/सोनवद मार्गावर धावणाऱ्या व ये-जा करणाऱ्या ऐकून सर्व बसेसना (एस.टी.) ग्रामीण रुग्णालय मोहिदा ता.शहादा जवळ थांबा दिल्यास रुग्णांन सहित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा होत असलेला आर्थिक भुर्दंड कमी होऊन वेळेचेही बचत होणार आहे.
या करिता शिवसेने तर्फे आगार व्यवस्थापक श्री.हरीश भोई यांना निवेदना/अर्जाद्वारे मागणी करण्यात आली आहे की,ग्रामीण रुग्णालय मोहिदा ता.शहादा जवळ एस.टी.बसेस थांबासाठी फलक लावून शहादा आगारातील शहादा-कहाटूळ/सोनवद मार्गावर धावणाऱ्या व ये-जा करणाऱ्या ऐकून सर्व बसेसना (एस.टी.) ग्रामीण रुग्णालय मोहिदा ता.शहादा येथे थांबा देण्यात यावे याप्रसंगी शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल,शिवसेना उप जिल्हा प्रमुख श्री.राजेंद्र पेंढारकर,माजी नगर सेवक श्री.सुपडूभाऊ खेडकर,महानगर प्रमुख श्री.लोटन धोबी,पत्रकार व जेष्ठ शिवसैनिक श्री.राजेंद्र गायकवाड,शिवसेना युवा तालुका प्रमुख श्री.राजरत्न बिरारे,शिवसैनिक श्री. मनोज पाथरवट.जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीसह दिलेल्या निवेदनावर सह्या आहेत..