Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शहादा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त अभाविप तर्फे भव्य तिरंगा पदयात्रा संपन्न. शहरात ५४१ फुटी तिरंगा पदयात्रेने वेधले लक्ष; भारत मातेच्या देखाव्याने शोभा वाढवली .

 शहादा  दि १४ (प्रतिनिधी)  शहादा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त अभाविप तर्फे भव्य तिरंगा पदयात्रा संपन्न. शहरात ५४१ फुटी तिरंगा पदयात्रेने वेधले लक्ष; भारत मातेच्या देखाव्याने  शोभा वाढवली .

सदर रॅलीचे आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , शहादा शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले . अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व व्हॉलेंटरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५४१ फूट लांबीची भव्य तिरंगा यात्रा काढली. ही यात्रा शहरातील मुख्य बाजार पेठेतून काढण्यात आली . यामध्ये ६०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी , शिक्षक, नागरीक, डॉक्टर, वकील, कामगार, तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते . यात्रेचे प्रमुख आकर्षण हे ५४१ फुटी ध्वज व भारत मातेच्या प्रतिकृती मध्ये आलेली विद्यार्थिनी होती . याच्यामुळे यात्रेची शोभा अधिक वाढली आणि देशभक्तीचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचला. या तिरंगा पदयात्रेसाठी विशेष उपस्थिती ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांत मंत्री कुमारी वैभवी ढिवरे यांची होती . तसेच व्हॉलेंटरी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थाचालक ॲड. राजेश जी कुलकर्णी हे देखील पूर्ण वेळ उपस्थित होते. तसेच या यात्रेच्या समोर प्रसंगी शहादा शहर पोलीस स्टेशन उपनिरीक्षक माननीय अमरसिंग वसावे, अभाविप जिल्हा संयोजक साक्षी जगदाळे, प्राचार्य नैना पाटील मॅडम हे देखील उपस्थित होते. या तिरंगा पद यात्रेला भेट देण्यासाठी शहादा शहर पोलीस निरीक्षक निलेश देसले हे सुद्धा उपस्थित होते. यानंतर शहादा पोलीस स्टेशन उपनिरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन दिले. या तिरंगा पदयात्रेमध्ये अभाविपचे कार्यकर्ते कार्तिक तोमर, आदित्य पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पुर्वकार्यकरते ॲड. विनोद चव्हाण, योगेश अहिरे, स्वरूप जैन, संदीप खेडकर हे देखील उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाला समारोप पसायदान घेऊन करण्यात आला.