शहादा ..दि.१५ऑगस्ट रोजी आपल्या जिल्हा परिषद शाळा, प्रभूदत्तनगर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ग्रा.पं.सदस्या श्रीमती.चंद्रभागा ताई ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रीय ध्वजाला सलामी देत सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन वातावरण देशभक्तीमय केले.
स्वातंत्र्य सेनानींच्या प्रेरणादायी कार्याची आठवण म्हणून स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभूषा,भाषणे, कवायत व देशभक्ती पर गीतगायन करून विद्यार्थ्यांनी एकतेचा व देशप्रेमाचा संदेश दिला. व उपस्थितांची मने जिंकली.
गावातील पालक, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे सोहळ्याचे सौंदर्य अधिकच खुलले. सर्वांच्या उत्साही सहभागामुळे शाळा परिसरात देशभक्तीचा सण अधिकच उजळून निघाला.
प्रसंगी गावातील शिक्षण प्रेमी श्री.रामभाई पाटील यांनी सपत्नीक सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून कपास पेट्या दिल्या व श्रीमती कल्पना मोरे, सौ.काजल मोरे यांनी रोख रक्कम व काही पालकांनी चाॅकलेट पूडे दिले तसेच झेंडावंदनासाठी श्रीमती.सूनिता पाटील, सुकन्या पाटील,शांताताई पाटील, दिलीप सोनवणे, अनिल पवार,महेश पाटील.अं.सेविका पूनम पाटील,आशावर्कर कल्पना सोनवणे इ. मान्यवर उपस्थित होते व शेवटी श्रीमती.शांताताई पाटील यांनी सर्वांना नृत्याचा आस्वाद घेण्यास भाग पाडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्या.श्रीमती.छाया न्हासदे, सहशिक्षिका योगिता भामरे, प्रशिक्षणार्थी.नैनिता रावताळे, सर्व विद्यार्थी व मदतनीस सौ.सुनंदा कोळी आणि काशीताई पाटील यांनी मेहनत घेतली.