शहादा तालुक्यात समता युवा मंचच्या माध्यमातून युवकांसाठी समाज कार्य करणारे व शिवसेनेचे कार्य जोमाने करणारे युवा कार्यकर्ते श्री. राजरत्न बिरारे यांच्या कामाची दखल घेत शिवसेनेच्या नंदुरबार जिल्हा उप प्रमुख पदी नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार श्री. चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार जिल्हा प्रमुख श्री राम भैय्या रघुवंशी व शिवसेना नंदुरबार जिल्हा युवा सेनेचे प्रमुख श्री. मोहितसिंग राजपुत यांच्या सहीचे नियुक्ती पत्र तळोदा येथे आमदार श्री.चंद्रकांत रघुवंशी, आमदार श्री.आमश्यादादा पाडवी, शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.राम भैय्या रघुवंशी,शिवसेना जिल्हा प्रमुख श्री.गणेश दादा पराडके, शिवसेना जिल्हा जिल्हा सह संपर्क प्रमुख श्री.लक्ष्मण वाडीले,जिल्हा उप प्रमुख श्री.डॉ.राजेंद्र पेंढारकर, शहादा तालुका प्रमुख श्री.मनलेश जायसवाल,महिला आघाडी समन्वयक सौ.सरिताताई माळी, महिला संपर्क प्रमुख सौ.कविताताई चौधरी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ.ज्योती ताई राजपुत यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोदा येथे महिला मेळाव्या प्रसंगी पाणी पुरवठा मंत्री श्री. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी शहादा तालुक्यातील श्री. जयसिंग ठाकरे, श्री.विजय गायकवाड,श्री.मनोज पाथरवट, श्री. गणेश महाजन, श्री.लक्ष्मण पवार, श्री.गोपाल पावरा, श्री.एकनाथ ठाकरे,श्री.रणजीत शेमले, श्री. कांतीलाल धनगर सह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेनेचे युवा शिवसैनिक राजरत्न बिरारे यांची नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उप प्रमुख पदी नियुक्ती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
August 16, 2025
शहादा दि (१७) शिवसेनेचे युवा शिवसैनिक राजरत्न बिरारे यांची नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उप प्रमुख पदी नियुक्ती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत करण्यात आली आहे.