तळोदा दि १७ (प्रतिनिधी) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा रोझवा पुनर्वसन क्रमांक चार येथे हर घर तिरंगा हा राष्ट्रीय कार्यक्रम घेण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन पावरा हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भरत पावरा जयराम पावरा, सुरेश पावरा,ईरा पावरा,नमा पावरा,शिवाजी पावरा, जामसिंग पावरा, मीना पावरा,वर्षा पावरा,मुन्नी पावरा,सुशिला पावरा, फुलवंती पावरा,गिरा पावरा,. वंती पावरा,करुणा पावरा हजर होते . तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक वृंद,विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते देशभक्तीच्या भावनेतून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्यांसह, गुरुजन वर्ग शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते . तीन दिवस " हर घर तिरंगा " हा शासनाचा महत्वकांक्षी उपक्रम राबविण्यात आला .विद्यार्थ्यांचे आई-वडील सुद्धा मोठ्या प्रमाणात हजर होते .शिक्षक वृंदानी विविध उपक्रम घेतले . रंगित तालीम घेण्यात आली .शाळेत " तिरंगा " चे महत्व,भाषण स्पर्धा,देशभक्तीपर गीतांवर कवायत सादरीकरण, चित्रकला स्पर्धा, भाषण स्पर्धा, जनजागृतीसाठी घेण्यात आले . सर्व वातावरण राष्ट्रभक्तीमय होते तसेच देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले . गावामध्ये प्रत्येक घराच्या अंगणात तिरंगा लावण्यात आला होता .त्यावरून देशभक्ती जागृती करण्यात आली .शाळेमध्ये शाळा ही शिक्षणाची जागा नसून राष्ट्रभक्ती रुजविणारी कार्यशाळा आहे असे सर्वांच्या मनात ठासून सांगितले . जिथे तिरंगा फडकतो तिथं मनामनात अभिमानाची लाट उसळते तसेच जयवंती चौधरी मॅडम यांनी देशभक्तीपर कवायत, गाणी सादर केली . मुख्याधापक सिद्धार्थ सुर्यवंशी, शिक्षकवृंद रविंद्र पाडवी, शरद गांगुर्डे, लक्ष्मण पावरा, रविंद्र मुजगे,मेरसिंग पावरा, रमेश राऊत, जयेश पाडवी, कल्पेश वळवी, दारासिंग पावरा, देविदास पाडवी, अनिता वळवी, जयवंती चौधरी, मालती पाडवी, यावेळी ग्रामस्थांनीही सहकार्य केले अशा पद्धतीने " हर घर तिरंगा "लावून राष्ट्र भक्तीची जनजागृती केली . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र मुजगे तर आभार जयवंती चौधरी यांनी मानले . झेंडा उतरवून कार्यक्रमाची पूर्वसंधेला सांगता करण्यात आली .