भारतीय संस्कृतीच्या भावनिक बंधनाचे प्रतीक असलेल्या या सणाचे विद्यार्थ्यांना महत्त्व समजावे,या उद्देशाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन शाळेत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सिद्धार्थ गुलाले सर हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीम.योगिता अजय वळवी हे होते. तसेच कार्यक्रमाला श्रीम.सुमित्राबाई विक्रम वळवी श्रीम.अश्विनी करण वळवी श्रीम.मायाबाई पंकज गावीत श्रीम. अमित्रा लखन वळवी.हे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रावण रावताळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीम.शर्मिला वसावे मॅडम यांनी केले.कार्यक्रमात शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी संचालित नटावद के.डी.गावीत प्राथमिक विद्यामंदिर धानोरा येथे रक्षाबंधन संपन्न
August 09, 2025
आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी संचालित नटावद के.डी.गावीत प्राथमिक विद्यामंदिर धानोरा येथे रक्षाबंधन हा सण पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.