Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जागतिक आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जागतिक आदिवासी दिवसानिमित्त ,विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

नंदुरबार - दि. ९ ऑगस्ट 
विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधून नंदुरबार तालुक्यातील वाघाळे व नटावद येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना विश्व आदिवासी सेवा संघटनांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षण हे प्रगतीचे साधन असून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक पात्रता वाढावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद येथील प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स, स्कूल बॅग, गणवेश आदी साहित्य मोफत वितरित करण्यात आले.
           कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ नरेश एम पाडवी अतिजिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नंदुरबार, विश्व आदिवासी सेवा संघटनेचे केंद्रीय संस्थापक तथा अध्यक्ष जितेंद्र टी बागुल केंद्रीय सचिव संभाजी जगताप केंद्रीय सहसचिव विनायक के गावीत केंद्रीय कोषाध्यक्ष गुलाब गावीत केंद्रीय सदस्य सुभाष जी कोकणी महाराष्ट्र प्रदेश सचिव किशोर बी पावरा अक्कलकुवा तालुका अध्यक्ष जितेंद्र जी तडवी धडगाव तालुका अध्यक्ष कालूसिंग डी वळवी नंदुरबार जिल्हा सदस्य शरद पाडवी नंदुरबार तालुका सदस्य अभित कोकणी धुळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कुणाल गावीत ,संदीप चौरे ,संदीप बोरसे किशोर गवळे ,मनेष कोकणी व पत्रकार बांधव, शैक्षणिक,आरोग्य , क्षेत्रातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नरेश पाडवी यांनी सांगितले की
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात अडथळा येऊ नये, यासाठी या प्रकारचे उपक्रम गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी थोर समाजसेवक यांच्या बद्दल माहिती मिळावी त्यासोबतच शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील असे देखील सांगितले.यावेळी शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या उपक्रमामुळे आमच्या मुलांचे मनोबल वाढले असून ते अधिक आत्मविश्वासाने शिक्षण घेतील,अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली.
    या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्यात यावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.