Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तळोदा शहर आधुनिक सोयी सुविधायुक्त बनवणार,

तळोदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या धुराळा उडाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे क्रीडामंत्री कोकाटे यांची जाहीर सभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्रीताई चौधरी व त्यांचे १८ उमेदवारांसाठी घेण्यात आली या सभेत बोलताना योगेश चौधरी यांनी सांगितले की मी तुमच्या विश्वासावर माझ्या पत्नीची उमेदवारी केलेली आहे
 मला विश्वास आहे की नगराध्यक्ष सह सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारांना आपण साथ द्याल दरम्यान यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही पालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खेचून आणेल असा विश्वास व्यक्त करत योगेश चौधरी यांच्या रूपातून एक उमदा नेता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला असून तळोदा शहरात मिळाला आहे व त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला
 तसेच पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना सांगितले की लाडकी बहीण योजना ही कोणत्याही एका नेत्याची अथवा पक्षाची नसून तिन्ही पक्ष आज राज्यात सत्तेत असल्यामुळे या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या देखील सिंहाच्या वाटा आहे तो उद्या शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी काँग्रेस पक्षाला साथ द्या मी निधीची कमतरता भासू देणार नाही भाग्यश्री चौधरी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार नसून त्या अजित दादा पवार यांच्या उमेदवार आहेत एवढं सर्वांनी लक्षात ठेवावं अजित दादा पवार यांच्याकडे अर्थ खात असल्याने निधीची कमतरता पडू न देता तळोदे शहरात आधुनिक शहर बनविण्याशिवाय राहणार नाही 
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ द्या मागील काळात विकास झालेला दिसून येत नाही मात्र आम्हाला जर संधी मिळाली तर निश्चित उद्या शहराच्या कायापालट करू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला