स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती नवेगाव ता कोरपना जि. चंद्रपूर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली.
जनजागृतीपर व्याख्याने,गायन कला, आणि सामूहिक भोजन अशा विविध उपक्रमांसह स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प सोडत क्रांतीज्योतीला अभिवादन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शनामध्ये आकाश पाजारे यांनी जिल्हा परिषद शाळा बंद होण्यामागचे कारण सांगून गावकऱ्याना आपली शाळा कशी जिवंत ठेवायची याबद्दल विनंती केली.
कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ कातकर यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजक, बबन पेंदोर, वनमाला देठे कातकर सरपंच ग्रामपंचायत वरोडा, सुनीता करमणकर, छबिता मुन, इंदू बाई धोटे, राणी वेलेकर, शारदा कातकर, गौतमा मेश्राम, वर्षा मेश्राम, मोनाली दुबे, सम्राट मेश्राम, अर्चित निरंजने.
आणि कार्यक्रमाला समस्त नवेगाववाशी खुप मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊन कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी आपले योगदान दिले.