प्रामुख्याने नायलॉन मांजा मुळे होणारे विघातक परिणाम, प्राणी, पक्षी तसेच मानवा वर होणारे दुष्परिणाम, त्यामुळं होणारे अपघात, काही वेळा तर जीव ही गमावावा लागतो, या सोबत पोलीस प्रशासन, प्रशासन, नगरपालिका, यांचा माध्यमातून जर मांजा विक्री करतांना आढळल्यास तुमच्यावर कठोर कार्यवाही होऊन शिक्षा ही होऊ शकते आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा जनजागृती करण्यात आली..या वेळी शहरातील सिंधीकॉलनी, गिरीविहारगेट, अमृत चौक, आणि विविध परिसरातील पतंग आणि दोरा विक्रेते यांना मांजा विकू नका आणि कॊणलाही विकू देऊ नका.. अशी विनंती प्रत्येक विक्रेत्याला गुलाब पुष्प देऊन करण्यात आली. या उपक्रमाला शहरात सर्व विक्रेते बांधवाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या वेळी अध्यक्ष संजय वानखेडे, सचिव जितेंद्र खवळे, गणेश पवार, चेतन आखाडे, राहुल गावित,गौरव मराठे,बलवंत भुरट, अनुराग महाले,रोशन वसावे, सूरज वळवी, विशाल पाडवी, हरीश पाडवी, मनीष ठाकरे,करण नाईक, सुदाम ठाकरे आदी उपस्थित होते
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गांधीगिरी पद्धतीने नायलॉन मांजा विक्री विरुद्ध जनजागृती
January 06, 2026
तळोदा दि ६ (प्रतिनिधी) मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गांधीगिरी पद्धतीने नायलॉन मांजा विक्री विरुद्ध जनजागृती करण्यात आली.