Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुंबई माळी समाज सुधारणा मंडळाच्या वतीने सावित्रीआई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई दि ५(प्रतिनिधी) "अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या स्रियांना मार्ग दाखविणारी खरी विद्येची देवी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीआई फुले "असे प्रतिपादन मंडळाचे मा.अध्यक्ष व विद्यमान सल्लागार प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी यांनी श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,मुंबई यांच्या वतीने सावित्रीआई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले.माळी समाज भवन,उल्हासनगर-४ येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मंडळाच्या कार्यकारी सदस्या सौ.पुष्पा देविदास चव्हाण व सौ.मंगला भागवत शेलकर,महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा सौ.रेखा मुरलीधर महाजन यांच्या शुभहस्ते सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच मंडळाचे सल्लागार निळकंठ देवचंद महाजन,दिलीप सुकदेव माळी,प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी,मुरलीधर तुकाराम महाजन व मंडळाचे उपाध्यक्ष गुलाब संतोष महाजन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यकारिणी सदस्य विठ्ठल पवार,सौ.यशोदा भिमराव माळी,सौ.रजनी प्रकाश माळी,सौ.निशा साहेबराव महाजन,सौ.मनिषा अनिल माळी,नवयुवक मंडळाचे अध्यक्ष रुपेश मुरलीधर महाजन,सौ.शारदा पंकज माळी,सौ.रेखा दिलीप माळी,सौ.सुरेखा गजानन महाजन,सौ.संगिता संजय माळी,सौ.रत्ना किशोर महाजन,सौ.चारुलता रविंद्र माळी,सौ.मंगल प्रकाश राजकुळे,गजानन सुकदेव माळी,ऍड.शांताराम भिकन महाजन,महेंद्र भिमराव माळी,डॉ.राजेश साहेबराव माळी यांनी प्रतिमा पूजन करून सावित्रीआईंना विनम्र अभिवादन केले.या प्रसंगी निळकंठ महाजन,ऍड.शांताराम महाजन,विठ्ठल पवार,सौ.मंगला शेलकर व गुलाब महाजन यांनी सावित्रीआईचे विचार व्यक्त केले.सौ.रजनी माळी यांनी सावित्रीआईच्या कार्याविषयी ओवी,सौ.पुष्पा महाजन यांनी पाळणा,सौ.रत्ना महाजन यांनी गाणे तर प्रा.डॉ.प्रकाश माळी यांनी सावित्रीआई विषयी सुंदर गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे उपसचिव प्रा.भागवत शेलकर यांनी केले.