Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एचडीएफसी बँक परिवर्तन व सीनी- टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने, उपजीविका विकास प्रकल्प उद्घाटन सोहळा,अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील पंधरा गावांचा समावेश.


 तळोदा दि १६(प्रतिनिधी)  सांस्कृतिक भवन, भगदरी ता. अक्कलकुवा येथे एचडीएफसी बँक परिवर्तन सीएसआर आणि सीनी टाटा ट्रस्ट सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने सांस्कृतिक भवन भगदरी ता अक्कलकुवा येथे उपजीविका विकास प्रकल्प (FDP 1289) प्रकल्पाचा शुभारंभ  सोहळा पार पडला. या प्रकल्पा करिता 15 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये भगदरी, ओलपाडा, पांढरामाती, उमटी, वेहेगी, पिंपळखुटा परिसरातील गावांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून गावांमध्ये जल कृषी व उपजीविका विकसित होणार असून गावांमध्ये त्यासाठी महिला केंद्रित गाव उपजीविका समिती स्थापन करण्यात येणार आहे. संस्था व  गाव उपजीविका समिती यांच्या समन्वयाने गावांमध्ये जल, कृषी उपजीविका विकास  उपक्रम राबविण्यात येणार आहे. सुधारित शेती,  भाजीपाला लागवड, उत्पन्न वाढीचे उपक्रम यांना प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच शेळी पालन व्यवसायात उत्पन्नवाढीसाठी उस्मानाबादी शेळी पैदास करिता उपक्रम राबविण्यात येणार आहे.. या कार्यक्रमाच्या उद्घाघाटन प्रसंगी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये प्रा.श्री केदारनाथजी कवडिवाले , अध्यक्ष कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार,  रवी मोरे, डीडीएम, नाबार्ड, योगेश पगारे , व्यवस्थापक एचडीएफसी बँक परिवर्तन सीएसआर, विजयसिंग पाटील, रिजनल मॅनेजर सीनी संस्था, अमिताभ जी व राम पवार, एच डी एफ सी बँक,नंदुरबार, डॉ.हर्षवर्धन पाटील पशुधन अधिकारी, माधुरी वळवी, अध्यक्ष, याहमोगी शेतकरी उत्पादक कंपनी, मुदलवड,धडगाव, स्थानिक लोकप्रतिनिधी, अशोक राऊत, सदस्य पंचायत समिती अक्कलकुवा, भगदरी गावाचे सरपंच, पीरेसिंग पाडवी, लालसिंग वसावे,पोलिस पाटील, 15 गावातील गाव उपजीविका समिती पदाधिकारी व ग्रामस्थ कार्यक्रम वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बागुल यांनी केले त्यावेळी, नंदुरबार सीनी संस्था टीम शुभम खंडारे, डॉ. नागराव गाडेकर,  दिनेश परदेशी, सचिन निळे,हेमंत शिंदे, दिलीप वसावे, गोविंद राऊत, मंगलसिंग राऊत,आदी कार्यक्रमास उपस्थिती होते.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती. नीलम मुळे मॅडम यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.