संभाजीनगर दि (२०) जिल्हा विशेष प्रतिनिधी वैजापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खंडाळा ता. वैजापूर या गावात, हक्काचे बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे विशेषता: विद्यार्थिनींचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहे या प्रश्नाचे एम. आय.एम. पक्षाचे, युवा नेते, नेहाल भैय्या नबी पटेल, यांनी तातडीने बस स्थानकावर शेड उभारण्यासाठी मा. जिल्हाधिकारी साहेब छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या मुलींना बसण्यासाठी जागा नसल्याने,ठीक ठिकाणी दुकानांसमोर ताटकळत उभे राहावे लागते या संदर्भात नेहाल भैया पटेल यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब व ना. राज्य परिवहन मंत्री मुंबई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही रास्त जाहीर प्रमुख मागणी केली आहे की, येत्या पंधरा दिवसात बस स्टॅन्ड चे काम त्वरित सुरू न झाल्यास खंडाळा छत्रपती संभाजीनगर, महा मार्ग येथे भारतीय संविधानीक लोकशाही मार्गाने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची त्वरित, प्रशासनाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर एम. आय. एम. चे युवा नेते, नेहाल नबी पटेल, राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ अध्यक्ष डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, आदम मोमीन, आश्रफ मोमीन, अशपाक अ. रज्जाक शेख, मोईन पटेल, कैसर पटेल,फारूक शेख,मोबीन मुलतानी, अ. रहेमान शेख,संजय कोतवाल,नाना जानराव,मिलिंद मच्छिंद्र बागुल
ईमरान खंडाळकर,अंजुम अय्यूब शेख,शहेबाज शेख,
फईम नवाज खान, नवीद शेख, रईस सैय्यद, सलीम शेख,अल्ताफ पठाण,शाहरूख लतीफ पठाण,बशीरभाई पठाण, कंकरभाई शेख,मुसा खान, शेरूभाई पठाण, जावेद पठाण, बी.के सोशल फाउंडेशन आणि सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व समस्त ग्रामस्थ खंडाळा ता. वैजापूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.