Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

योग शिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांची तिसऱ्यांदा फेरनियुक्ती


नंदुरबार दि १(प्रतिनिधी) येथील जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सेंट मदर टेरेसा योग विद्याधामचे केंद्रप्रमुख डॉ. संजय शिंदे यांची महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मनोज निलपवार व राज्य कार्यकारिणीने योगशिक्षक संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनियुक्ती केली आहे. 
        डॉ. शिंदे यांनी पीएच.डी (शिक्षणशास्त्र) पीएच.डी (मराठी) एम .ए (कम्युनिकेशन) एम. ए (योगशास्त्र) शालेय व्यवस्थापक पदविका, योगशिक्षक पदविका, समंत्रण पदविका अशा विविध विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. 'नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या ताण - तणाव व्यवस्थापनेसाठी योगाभ्यासाच्या परिणामकारकतेचा अभ्यास' या विषयावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर विद्यापीठातून संशोधन कार्य केले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून शंभर पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. 'योग व निरामय जीवन' या विषयावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या राज्यस्तरीय शोधनिबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांकचा पुरस्कार मा.कुलगुरूंच्या हस्ते मिळाला आहे. त्यांच्या फेरनियुक्ती बद्दल संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई मोरे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे प्राचार्य डॉ. सतीश देवरे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. मनोज निलपवार (यवतमाळ), डॉ. संजय ढोले (पुणे), डॉ. योगेश कुलकर्णी (नाशिक), डॉ.कृणाल महाजन (जळगाव), डॉ. जितेंद्र भामरे (धुळे), डॉ. श्रीकांत वाडीले (शिरपूर ), डॉ. योगेश नांद्रे (पिंपळनेर), डॉ. हेमंत जाधव ( साक्री) योग शिक्षक संघाचे महासचिव शांताराम पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील योगप्रेमी योग शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले.